महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू -काश्मीर : त्राल भागात ३ अतिरेकी ठार, जानेवारीपासून एकूण ८९ दहशतवादी ठार - दहशतवादी न्यूज

सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा त्रालमध्ये खात्मा केला. हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. दरम्यान शुक्रवारीही पम्पोर भागात दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले होते.

3 militants killed in encounter in J&K's Tral area
जम्मू काश्मीर

By

Published : Aug 21, 2021, 9:03 AM IST

Updated : Aug 21, 2021, 8:03 PM IST

अवंतीपोरा (जम्मू-काश्मीर) - जैश-ए-मोहम्मद (जेईएम) या दहशतवादी संघटनेशी संबंधित तीन अज्ञात दहशतवाद्यांचा त्रालमध्ये खात्मा करण्यात आला आहे. ही माहिती जम्मू -काश्मीर पोलिसांनी दिली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तिघांना कंठस्नान घालण्यात आले. परिसरात अद्याप ऑपरेशन सुरू आहे.

शुक्रवारी पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ठार झालेले दोन्ही अतिरेकी स्थानिक होते. हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी संघटनेशी ते संबंधित होते. घटनास्थळावरून शस्त्र, स्फोटकांसह एके-रायफल आणि पिस्तुल ताब्यात घेण्यात आले होते.

श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला -

श्रीनगरमध्ये गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. श्रीनगरच्या सराफ कदाल भागात गुरूवारी रात्री 9.20 च्या सुमारास ही घटना घडली होती.

जम्मू काश्मीरात भाजपा नेते दहशतवाद्यांच्या लक्ष्य स्थानी -

गेल्या 17 ऑगस्टला भाजपाचे नेते जावेद अहमद दर यांची दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरात हत्या झाली. जावेद अहमद दर हे शालीभाग विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे प्रभारी होते. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हे सातत्याने भाजपा नेत्यांवर हल्ले करत आहेत. यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते जसबीर सिंग यांच्या निवासस्थानी 13 ऑगस्ट 2021 रोजी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाला.

जानेवरी 2021 पासून जम्मू-काश्मीरमध्ये 89 अतिरेकी ठार -

जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी सात पाकिस्तानी नागरिकांसह 89 अतिरेक्यांना ठार केले आहे. ही माहिती लष्कर आणि पोलिसांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु यावर्षी अधिक कमांडर मारले गेले, असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) विजय कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा -श्रीनगर: मोहरम मिरवणुकीचे वार्तांकन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींवर पोलिसांचा लाठीचार्ज

हेही वाचा -कलम 370 रद्द केल्यानंतर 'इतक्या' लोकांनी काश्मीरात घेतली जमीन, सरकारने लोकसभेत दिली माहिती

हेही वाचा -काय होते कलम 370, रद्द झाल्याने जम्मू काश्मीरमध्ये काय बदल झाले?

हेही वाचा -जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची मोठी कारवाई, 40 हून अधिक ठिकाणी छापे

Last Updated : Aug 21, 2021, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details