नवी दिल्ली :उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर 12 डिसेंबर रोजी सुनावणी ( Election Commission hearing on December 12 ) घेण्यात येणार आहे. आयोगाने म्हटलंय की, पक्षाच्या चिन्हाचा वाद "महत्त्वपूर्ण सुनावणी" च्या टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही गटांच्या पहिल्या वैयक्तिक सुनावणीसाठी १२ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली असून मंगळवारी आवश्यक आदेश जारी करण्यात आला.
12 डिसेंबर रोजी सुनावणी -शिवसेनेच्या निवडणूक चिन्ह वादावर ( ShivSena election symbol controversy ) 12 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज दिलेल्या आदेशात आयोगाने 12 डिसेंबर ही पहिल्या सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. आयोगाने 8 ऑक्टोबर आणि 12 नोव्हेंबरच्या सुनावणीच्या अंतरिम आदेशांमध्ये 23.11.22 पर्यंत तपशील व कागदपत्रे मागितली होती. दरम्यान, आयोगाने दोन्ही पक्षांना 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कोणतेही विधान/कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.