महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

World Elders Day : राजस्थानमध्ये १०० वर्षांपेक्षा जास्त वयाचे १४ हजारांहून अधिक मतदार

राजस्थानमध्ये असे 14 हजार मतदार आहेत, ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे ( 100 years old voters in Rajasthan ) . अशा १६८८ मतदारांची सर्वाधिक संख्या झुंझुनू ( Most voters of 100 years in Jhunjhunu ) जिल्ह्यात आहे. या सर्व मतदारांचा आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त सन्मान ( International Day of Older Persons ) करण्यात येणार आहे.

World Elders Day
जागतिक वृद्ध दिन

By

Published : Sep 30, 2022, 8:28 AM IST

जयपूर -राजस्थानमधील 33 जिल्ह्यांमध्ये 100 वर्षेहून ( 100 years old voters in Rajasthan ) अधिक वयाचे 14 हजार 976 मतदार आहेत. झुंझुनू जिल्ह्यात या वयोगटातील सर्वाधिक 1688 ( Most voters of 100 years in Jhunjhunu ) वृद्ध मतदार आहेत, तर सर्वात कमी 73 मतदार बरान जिल्ह्यात आहेत. राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या ज्येष्ठ मतदारांच्या प्रत्यक्ष पडताळणीत ही आकडेवारी समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त या वृद्धांचा गौरव -1 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिनानिमित्त या वृद्धांचा गौरव ( Honor on World Elders Day ) करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता ( Chief Electoral Officer Praveen Gupta informed ) यांनी सांगितले की, झुंझुनूनंतर जयपूरमध्ये 1 हजार 126, उदयपूरमध्ये 968, भिलवाडामध्ये 844, सीकरमध्ये 828, पालीमध्ये 820 मतदार आहेत, ज्यांचे वय 100 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे.

जेष्ठांचा होणार सन्मान - त्यांनी सांगितले की सर्वात कमी बराणमध्ये 73 मतदार आहेत ज्यांचे वय 100 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यानंतर चुरूमध्ये 96, टोंकमध्ये 103, ढोलपूरमध्ये 121, जैसलमेरमध्ये 153 मतदार 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. या मतदारांचा आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त सन्मान करण्यात येणार असून, ज्यांना चालता येते, त्यांचा पंचायत भवन किंवा शाळेच्या इमारतीत आयोजित कार्यक्रमात जाहीर सत्कार करण्यात येणार असून ज्यांना फिरता येत नाही, अशा मतदारांचा गौरव करण्यात येणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा सत्कार करतील, या कार्यक्रमाला इलेक्टोरल स्कूलचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाच्या ( Election Commission ) सूचनेनुसार देशातील निवडणूक प्रक्रियेत सातत्यपूर्ण योगदान दिल्याबद्दल, लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल या ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठांना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात मतदार जनजागृती उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details