नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने सुकेश चंद्रशेखर खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात जॅकलीनच्या 7.12 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींचा समावेश आहे. सुकेशने जॅकलिनला 5.71 कोटी रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा संशय ईडीला आहे. त्यांने तीला तसेच तीच्या कुटुंबातील सदस्यांना अमेरिकन डाॅलर्स च्या माध्यमातुनही नीधी दिला होता.
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez ) सुकेश चंद्रशेखर विरुध्द २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती.तीला दिल्लीतील ईडी कार्यालयात बोलावुन जबाबही नोंदवण्यात आला होता. जॅकलिनने या प्रकरणाशी संबंधित असलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. जॅकलिनला देशाबाहेर जाण्याची परवानगी नाही. अशा परिस्थितीत ती विदेश दौऱ्यावर जात असताना तिला विमानतळावरच रोखण्यात आले होते.
दोनशे कोटींच्या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखर (Accused Sukesh Chandrashekhar) हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा आणि अभिनेत्री जॅकलिनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो ज्यावेळी सुकेश हा जामिनावर बाहेर होता तेव्हाचा असल्याचे सांगितले जात होते. जॅकलिनला तो चेन्नईमध्ये चार वेळा भेटला होता, या भेटीसाठी त्याने प्रायव्हेट जेटची व्यवस्था केल्याचे सांगितले जात होते.