महाराष्ट्र

maharashtra

मुंद्रा हेरॉईन प्रकरणाच्या चौकशीत 'ईडी'चाही समावेश; 21 हजार कोटींचे ड्रग्ज करण्यात आले होते जप्त

By

Published : Sep 23, 2021, 2:17 PM IST

अफगाणिस्तानातून सुमारे 21 हजार कोटी रुपयांच्या ड्रग तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर देशातील सर्व एजन्सींनी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. डीआरआयनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) मनी लाँडरिंग संदर्भात अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे.

Mundra heroin case
Mundra heroin case

गुजरात - मुंद्रा पोर्टवर 21 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन हे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. आता या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक तथ्ये समोर येत आहेत. एकीकडे हेरोइनची तस्करी झाली नसल्याची चर्चा आहे. पण हा एक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करणारी डीआरआय टीम आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करेल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातून सुमारे 21 हजार कोटी रुपयांच्या ड्रग तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर देशातील सर्व एजन्सींनी त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. डीआरआयनंतर आता सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) मनी लाँडरिंग संदर्भात अंमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे.

आधीही भारतात दोन कंटेनरची तस्करी -

काही दिवसांपूर्वीच ईराणमधून अफगाणिस्तानमार्गे मुंद्रा येथे दोन कंटेनरमध्ये 3 हजार किलो हेरॉईन सापडली होती. हिरोईनची अधिकृत किंमत जाहीर करण्यात आली नसली. तरी या ड्रग्जचे जागतिक बाजार मूल्य 21 हजार कोटी रुपये आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील सहभागी होणार आहे. याशिवाय, हसन हुसेन कंपनीने आधीही भारतात दोन कंटेनरची तस्करी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. ते एक कंटेनर दिल्लीला पोहोचल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरा कंटेनर कुठे वितरित करण्यात आला आहे, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

काय आहे गुजरात ड्रग्ज प्रकरण? -

गुजरातच्या कच्छच्या मुंद्रा बंदरावर हेरॉईन पकडण्यात आले होते. ज्याची किंमत सुमारे 21 हजार कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. ही हेरॉईन अफगाणिस्तानातून आयात केले जात होते. दरम्यान, त्याला गुप्तचर यंत्रणेने बंदरावर पकडले आहे. हे हेरॉईन टेलकम पावडरच्या स्वरूपात भारतात आणले जात होते. परंतु, एजन्सीने वेळीच लक्ष दिल्याने बंदरावर ही आयात रोखण्यात आली. दरम्यान, एजन्सीची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. यातील कंटेनर आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील आशी ट्रेडिंग फर्मच्या माध्यमातून आफगाणिस्तानातून मुंद्रा बंदरावर आयात करण्यात आले होते.

हेही वाचा - इम्पेरिकल डेटाबाबत केंद्र सरकारची भूमिका समोर आली! - उपमुख्यमंत्री अजित पवार

ABOUT THE AUTHOR

...view details