कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई पाहायला मिळत असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचार सभा घेण्यात येत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर राजकारण तापत चाललं आहे. आता निवडणूक आयोगाने मोठं पाउल उचलत भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर २४ तासांची प्रचार बंदी घातली आहे.
आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल, त्यांच्यावर 15 एप्रिल सांयकाळी 7 वाजल्यापासून ते 16 एप्रिल सायंकाळी 7 पर्यंत प्रचार बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने भाजपा नेता राहुल सिन्हावर 48 तासांसाठी प्रचार बंदी लावली होती. तर गेल्या सोमवारी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांसाठी प्रचार बंदी घातली होती. अल्पसंख्याक मतांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली होती. ममतांनी लोकप्रतिनिधी कायदा आणि आचारसंहितेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं होते.
आठ टप्प्यात मतदान -