नवी दिल्ली : दिल्लीतून भूकंपाबाबत महत्वाची माहिती समोर येत आहे. दिल्ली आणि लगतच्या भागात जाणवले भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या काही दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवल्याचे घटना समोर येत आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी नोंदवण्यात गेली आहे. दरम्यान, पंजाब, उत्तराखंड, राजस्थानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
सतर्क राहण्याची गरज : नुकताच तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला होता. या आपत्तीत 20 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय अनेक जण जखमी देखील झाले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण जगात भूकंपाच्या अंदाजाबाबत चर्चा सुरू झाली होती. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक जावेद मलिक यांनी भूकंपाबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, भारतातही अशाच प्रकारे मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. मात्र अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी सतर्क राहण्याची गरज आहे.
का होतात भूकंप :प्राध्यापक जावेद मलिक यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधताना सांगितले की, जमिनीत खूप खोलीवर टेक्टोनिक प्लेट्स आहे. त्यांची हालचाल, एकमेकांवर आदळणे आणि चढ-उतार यामुळे प्लेट्समध्ये सतत तणावाची स्थिती निर्माण होत असते. नंतर त्याचे रूपांतर ऊर्जेत होते. त्यामुळे सर्वसामान्यपणे भूकंपाचे धक्के बसत असतात. जर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात सोडली गेली, तर भूकंपाचे जोरदार धक्के जाणवतात आणि त्यांची तीव्रता खूप जास्त असते. त्यांनी पुढे सांगितले की, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती.
रुद्रप्रयागमध्ये भूकंप : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये मंगळवारी संध्याकाळी भूकंपाच्या धक्क्याने जमीन हादरली होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे रुद्रप्रयागमधील लोकांमध्ये घबराट पसरली होती. घाबरून लोक घराबाहेर पडले होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.1 रिश्टर स्केल एवढी होती. परंतु या भूकंपामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या अगोदर उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. उत्तरकाशीमध्ये मध्यरात्री एकापाठोपाठ एक भूकंपाचे पाच धक्के जाणवले होते.
हेही वाचा :Earthquake In Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट