श्रीगंगानगर :जिल्ह्यातील घाडसाना आणि अनुपगड येथे बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री लोक झोपायला जात असताना भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लोक घराबाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री श्री गंगानगरच्या घडसाना आणि अनुपगडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. काही दिवसांपूर्वी अनुपगडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. ( Earthquake tremors felt in Sriganganagar )
यापूर्वी सोमवारी पहाटे बिकानेर आणि श्री गंगानगरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. राजधानी जयपूरमध्ये भूकंपाची तीव्रता रेक्टर स्केलवर 3.6 एवढी होती. दुपारी १२.३६ च्या सुमारास बिकानेर ते टोंक, बुंदीपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बिकानेरच्या वायव्येला झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, सोमवारी अनुपगढ, श्री गंगानगरमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. येथेही त्याची तीव्रता रेक्टर स्केलवर 4.1 होती, हे धक्के दुपारी 12.27 च्या सुमारास जाणवले. मात्र, कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.