हैदराबाद :वाईट कितीही शक्तिशाली असले तरी शेवटी चांगल्याचाच विजय होतो. प्रभू राम आणि रावण यांच्यातील युद्ध या ओळीतील प्रत्येक शब्द जिवंत करते. धर्मग्रंथानुसार भगवान रामानं सत्याचा मार्ग अवलंबला होता, पण रावण हा मोठा ज्ञानी असूनही दुष्टांनी वेढलेला होता. हेच कारण आहे की सीतेच्या अपहरणानंतर जेव्हा राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले तेव्हा प्रचंड सैन्य असूनही रावणाचा पराभव झाला. तेव्हापासून वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून विजयादशमी किंवा दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे म्हणतात. पुराणानुसार, विजयादशमीचा हा सण प्रभू श्री रामानं रावणावर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
- 2023 मध्ये दसरा किंवा विजयादशमी कधी आहे ? यावेळी 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसरा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी कोणतेही विशेष काम केल्यानं तुम्हाला यश मिळते. विजयादशमी ही वर्षातील तीन सर्वात शुभ तिथींपैकी एक आहे. इतर दोन तिथी म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा आणि कार्तिक शुक्ल पक्षातील प्रतिपदा.
दसरा 2023 शुभ मुहूर्त :
- दशमी तिथी सुरू होते- 23 ऑक्टोबर 2023 संध्याकाळी 5.44 पासून
- दशमी तिथीची समाप्ती - 24 ऑक्टोबर 2023 दुपारी 3:14 पर्यंत
- शस्त्रपूजनासाठी शुभ वेळ - 24 ऑक्टोबर दुपारी 1:58 ते 02:43 पर्यंत
- रावण दहन मुहूर्त - 24 ऑक्टोबर सायंकाळी 05.43 नंतर
- रावण दहनाची एकूण शुभ वेळ– अडीच तास
- दसरा तारीख -24 ऑक्टोबर 2023
दसऱ्याला घडत आहेत हे शुभ योगायोग: यंदा दसऱ्याला रवि योग आणि वृद्धी योगाचा योग आहे. रवि योग 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3:28 पर्यंत राहील. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.40 वाजेपासून वृद्धी योग रात्रभर चालेल. रवियोगात उपासना केल्यानं विजय आणि प्रगती होईल, तर वृद्धी योगात उपासना केल्यानं अनेक पटींनी अधिक शुभ फल प्राप्त होतील. दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 1:36 ते 2:21 पर्यंत असेल. तुम्ही कोणतेही काम करून तुमचा विजय निश्चित करू शकता.
दसरा किंवा विजयादशमीचे महत्त्व :दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिथीला दसरा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध करून लंका जिंकली होती. विजयादशमीच्या दिवशी एखाद्याच्या कामाशी संबंधित शस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. याशिवाय विजयादशमीच्या दिवशी तुमच्या घरावर किंवा मंदिरात लाल ध्वज फडकावा. हा ध्वज विजयाचे प्रतीक आहे. यासह तुमचा विजय चिरकाल टिकेल. याशिवाय विजयादशमीचा दिवस कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो.
हेही वाचा :
- Navratri 2023 Day 8 : दुर्गाष्टमीला करा महागौरीची पूजा; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग
- Navratri 2023 Day 7 : देवी कालरात्रीच्या पूजेनं मिळते आसुरी प्रभावापासून मुक्ती; जाणून घ्या उपासनेची पद्धत आणि रंग
- Navratri 2023 Day 6 : कात्यायनी देवीची पूजा केल्यानं सर्व दु:ख होतात दूर; जाणून घ्या पूजा पद्धत आणि रंग