दसरा ( Dussehra ) दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. याला विजयादशमी ( vijayadashmi 2022 ) किंवा आयुधा पूजा असेही म्हणतात. दसरा हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय असा हा सण सर्वांना धडा शिकवतो. विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, म्हणून या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. 2022 मध्ये दसरा हा सण बुधवार, 05 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो. चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र (Navratri 2022) साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. ( Vijayadashami Date Time Shubh Muhurat And Significance )
2022 मध्ये दसरा कधी आहे (Dussehra 2022 Date ) - दसरा हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला साजरा केला जातो. दिवाळीच्या 20 दिवस आधी पडते. यंदा दसरा हा सण बुधवार, ५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. याआधी अश्विन नवरात्र येते. तर हा सण साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो.