महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Today Vegetable Prices: भाजीपाल्याचे भाव कडाडले; मान्सूनपूर्व पावसाचा फटका

काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका शेतीतील पिकांना बसला आहे. त्यामध्ये मठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ( What are the prices of vegetables ) त्यामुळे सध्या भाजीपाल्याच्या बाजारात तेजी आहे. भाजीपाल्यासह फळांचेही चांगलेच भाव कडाडले आहेत.

Today Vegetable Prices
Today Vegetable Prices

By

Published : Jun 5, 2022, 7:26 AM IST

Updated : Jun 5, 2022, 7:54 AM IST

मुंबई - अतिपावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला आहे. त्यामुळे आवक मंदावली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एरवी 30 ते 40 रुपये किलो मिळणारा भाजीपाला 70 ते 80 रुपये झाला आहे. ( vegetables were destroyed ) त्यामुळे सर्वसामान्यांना भाजीपाला खरेदी करणे कठीण झाले आहे. विशेषत: ढबू, काकडी, गवार, बिन्स, दोडकी, टोमॅटो, मेथी आदी भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.

  • बाजारभाव खालीलप्रमाणे
  • ढबू 80 रुपये किलो
  • काकडी 80 रुपये किलो
  • दोडकी 60 रुपये किलो
  • कांदे 20 रुपये किलो
  • गवार 80 रुपये किलो
  • बिन्स 80 रुपये किलो
  • ओली मिरची 50 रुपये किलो
  • वांगी 40 रुपये किलो
  • टोमॅटो 6० रुपये किलो
  • भेंडी 50 रुपये किलो
  • बटाटा 53० रुपये किलो
  • कारली 40 रुपये किलो
  • कोबी 10 रुपये
  • फ्लॉवर 20 रुपयांना 1
  • कोथिंबीर 20 रुपये पेंडी
  • कांदापात 10 रुपये पेंडी
  • मेथी 30 रुपये पेंडी
  • शेपू 20 रुपयाला 1. पेंडी
  • 10 रुपयाला 4 लिंबू

एप्रिल-मे महिन्यातसरासरीपेक्षा वळिवाचा पाऊस अधिक प्रमाणात झाला आहे. याबरोबर आता मान्सूनपूर्व पाऊसही सातत्याने होत असल्याने भाजीपाला पीक कुजले आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. याचाच परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर होऊन दर गगनाला भिडले आहेत. आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला वाढत्या भाजीपाल्याच्या दराचे चटके सहन करावे लागत आहेत.

पुढील आठवडय़ापासून आवक वाढण्याची शक्‍यता-भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने शेतकऱ्यां भाजीपाल्याची लागवड अधिक प्रमाणात केली आहे. विशेषत: कोथींबीर, मेथी, बिन्स आदी भाज्यांची पेरणी झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात भाजीपाल्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून काही प्रमाणात भाज्यांच्या दरात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -Rates of Petrol-Diesel: पेट्रोल डिझेलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे नवे दर

Last Updated : Jun 5, 2022, 7:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details