चेन्नईविमानतळावर सीमा शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करीत 100 कोटी रुपायंचे ड्रग्ज जप्त Drugs worth Rs 100 crore seized केले. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. इथिओपियाच्या आदिस अबाबा येथून शुक्रवारी चेन्नईला आलेल्या इथिओपियन एअरलाइन्सच्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये, आफ्रिकन देशांतील प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. मात्र त्यांच्याकडे कोणतेही अंमली पदार्थ आढळले नाहीत. तर इक्बाल पाशा या भारतीय प्रवाशाच्या चौकशीतून त्याच्याकडे ड्रग्ज असण्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यानंतर त्याची वेगळ्या खोलीत नेऊन चौकशी करण्यात आली.
या प्रकरणी अधिकाऱ्यांना इक्बाल पाशा नावाच्या भारतीय प्रवाशाला संशय आला जो आफ्रिकेतून चेन्नईला आला होता आणि त्याला चौकशीसाठी थांबवले. मात्र प्रवाशाने योग्य उत्तर दिले नाही. त्यानंतर त्याला वेगळ्या खोलीत नेऊन कसून तपासणी करण्यात आली. त्याचे कपडे अंतर्वस्त्रे आणि बूट वस्तूंमधून तब्बल एकूण 9 किलो 590 ग्रॅम कोकेन आणि हेरॉईन जप्त Drug trafficking करण्यात आले. त्यांची आंतरराष्ट्रीय किंमत 100 कोटी रुपये आहे.