महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LPG Cylinder Price : गृहिणींसाठी आनंदाची बातमी; सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला महिलांसाठी आनंदाची बातमी मोदी सरकारनं दिली. एलपीजी सिलेंडरवर 200 रुपयांच्या सबसिडीला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. त्यामुळं आता घरगुती सिलेंडर हा 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. याचा फायदा देशातील करोडो लोकांना होणार आहे. (LPG Cylinders Price Reduced 200 Rs) (LPG Cylinders Price) (Raksha Bandhan 2023 Gift)

Etv Bharat
Etv Bharat

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 4:39 PM IST

Updated : Aug 29, 2023, 5:29 PM IST

नवी दिल्ली - देशभरातील गृहिणींना मोदी सरकारनं राखी पोर्णिमेच्या एक दिवस आधी मोठं गिफ्ट दिलं. बुधवारपासून (30 ऑगस्टपासून) घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या 200 रुपयांनी कमी होणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी केली. केंद्रीय मंत्रिमंडळानं एलपीजी सिलेंडरवर 200 रुपयांच्या सबसिडीला मंजुरी दिली. यामुळे सर्व गॅस ग्राहकांना 200 रुपयांनी स्वस्त गॅस सिलेंडर मिळणार आहे. (LPG Cylinders Price Reduced 200 Rs) (LPG Cylinders Price) (Raksha Bandhan 2023 Gift)

मोफत गॅस कनेक्शन मिळणा्र - ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्तानं सिलेंडर 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय 'उज्ज्वला' गॅस योजनेंतर्गत 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. यासाठी त्यांना एक रुपयाही मोजावा लागणार नाही. त्यासोबत पाईप, स्टोव्ह आणि सिलेंडरही मोफत दिलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

करोडो ग्राहकांना होणार फायदा - 'उज्ज्वला' योजनेंतर्गत यापूर्वी 200 रुपये सबसिडी होती. तर आता त्यावर 200 रुपयांची अतिरिक्त सबसिडीचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच आता उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना 400 रुपये सबसिडी मिळणार आहे. 33 कोटी लोकांकडं गॅस सिलेंडर कनेक्शन आहेत. त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जाणार आहेत. त्यासाठी 7680 कोटी खर्च येणार असल्याची माहिती अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करोडो महिलांना उज्ज्वला' सिलेंडरचा लाभ - 'उज्ज्वला' सिलेंडरसाठी केंद्र सरकार प्रत्येक कनेक्शनसाठी 3 हजार सहाशे रुपये खर्च करत आहे. आतापर्यंत 9.60 लाख महिलांना 'उज्ज्वला' सिलेंडरचा लाभ देण्यात आल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं. आताही यामध्ये 75 लाख नवीन महिलांना 'उज्ज्वला' योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -LPG Gas cyclinder Price: व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर

Last Updated : Aug 29, 2023, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details