चेन्नई : भाजप नेत्या तथा अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्यावर डिएमकेचे प्रवक्ते शिवाजी कृष्णमूर्ती यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. याप्रकरणी खुशबू सुंदर यांनी महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर डिएमके पक्षाने पक्षशीस्तीचा भंग केल्याचा बडगा उगारत शिवाजी कृष्णमूर्ती यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर शिवाजी कृष्णमूर्ती यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या खुशबू सुंदर यांनी महिला आयोग हे प्रकरण आणखी लावून धरणार असल्याचे स्पष्ट केले.
डिएमके पक्षातून केली हकालपट्टी :अभिनेत्री तथा भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या या खालच्या पातळीवरील टीकेमुळे पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी ट्विटरवरही या मुद्द्याला उचलून धरले. त्यानंतर खुशबू सुंदर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत डिएमके पक्षावर चांगलीच टीका केली. मात्र खुशबू सुंदर यांच्यावरील टीकेनंतर डिएमकेने शिवाजी कृष्णमूर्ती यांची पक्षातून हकालपट्टी केली.
पोलिसांनी केली अटक :भाजप नेत्या खुशबू सुंदर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे शिवाजी कृष्णमूर्ती यांची डिएमकेतन हकालपट्टी केल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशिरा शिवाजी कृष्णमूर्ती यांना कोडुंगायुर पोलिसांनी अटक केली. खुशबू सुंदर यांच्यावर करण्यात आलेल्या खालच्या पाथळीवरील टीकेच्या या प्रकरणात महिला आयोगही आक्रमक झाला आहे.
महिलांकडे पाहण्याचा चुकीचा दृष्टिकोन :खुशबू सुंदर यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना टॅग करत शिवाजी कृष्णमूर्ती यांनी केवळ माझाच अपमान केला नाही तर तुमचा आणि तुमच्या वडिलांसारख्या महान नेत्यांचा अपमान केला आहे. तुम्ही त्यांना जितकी जास्त जागा द्याल तितकी राजकीय जागा गमावाल. तुमचा पक्ष गुंडांचा आश्रय होत आहे. ही शरमेची बाब आहे, असे ट्विट केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत खुशबू सुंदर यांनी राजकीय पक्षांच्या सर्वसाधारणपणे महिलांकडे पाहण्याच्या चुकीच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मी सर्व महिलांसाठी बोलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अन्नामलाई यांनी केले ट्विट : भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी एक क्लिप देखील ट्विट केली. यामध्ये कृष्णमूर्ती यांनी राज्यमंत्री व्ही सेंथिल बालाजी यांच्या अटकेनंतर तामिळनाडू मंत्रिमंडळातील खात्यांच्या पुनर्वाटपाबाबत राज्यपालांबद्दल काही आक्षेपार्ह टिप्पणी केल्या होत्या. राज्यपाल रवी यांच्याबद्दलच्या त्या वादग्रस्त विधानानंतर कृष्णमूर्ती यांना पक्षाने निलंबित केले होते, परंतु त्यांनी माफी मागितल्यानंतर निलंबन मागे घेण्यात आले होते. द्रमुकचे सरचिटणीस दुराईमुरुगन यांनी पक्षाच्या एका निवेदनात कृष्णमूर्ती यांची आज हकालपट्टी करण्याची घोषणा केली. 'शिवाजी कृष्णमूर्ती यांना पक्षशिस्तीचा भंग आणि बदनामी केल्याच्या आरोपावरून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह पक्षाच्या सर्व पदांवरून बडतर्फ करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा -
- Khushbu Sundar Twitter : काँग्रेसकडून जुन्या ट्विटचा संदर्भ; तुम्ही इतके हताश का? खुशबू सुंदर यांचा पलटवार
- TN Govt On CBI : सीबीआयला तामीळनाडूत येण्याचे रस्ते बंद, तपासासाठी घ्यावी लागेल द्रमुक सरकारची परवानगी