महाराष्ट्र

maharashtra

निवडणुकांच्या घोषणांनंतर तामिळनाडूमध्ये जागावाटपाच्या चर्चांना गती

By

Published : Mar 2, 2021, 9:50 PM IST

निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असतानाही तामिळनाडूमधील दोन मुख्य पक्ष आपापल्या साथीदारांसोबत अजूनही जागावाटपाबाबतच चर्चा करत आहेत. या दोन्ही पक्षांना जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे इतर पक्षांना जास्तीत जास्त प्रमाणात घासाघीस करावी लागणार आहे.

DMK and AIADMK plays hard in the bargains with their partner; Seat sharing talks in stalemate
निवडणुकांच्या घोषणांनंतर तामिळनाडूमध्ये जागावाटपाच्या चर्चांना गती

चेन्नई :तामिळनाडूमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या चर्चांना गती मिळाली आहे. डीएमकेने काँग्रेस, व्हीसीके, एमडीएमके आणि डाव्या पक्षांसोबत युती केली आहे. तर एआयएडीएमके, पीएमके, डीएमडीके आणि भाजपाची युती आहे.

डीएमकेची परिस्थिती..

सीपीआय आणि सीपीएमने आज (मंगळवार) अण्णा अरिवलयम येथे डीएमकेसोबत चर्चा केली. या चर्चेतून कोणताही तोडगा समोर आला नाही. डाव्या पक्षांना दोन अंकी जागांची अपेक्षा आहे. मात्र, डीएमके त्यांना एवढ्या जागा देण्यास तयार नाही. या आघाडीमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या निवडणुकांमध्ये ४० जागा मिळाल्या होत्या. यावेळी ते ३५ जागा मागत आहेत. मात्र, डीएमके त्यांना २५हून अधिक जागा देण्यास तयार नाही.

एआयएडीएमकेची परिस्थिती..

दुसरीकडे एआयएडीएमके युतीमध्येही जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. पीएमकेसोबत जागावाटपाचा निर्णय ठरल्यानंतर आता डीएमडीके आणि भाजपाला जागा देण्यासाठी एआयएडीएमकेला कसरत करावी लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा ३०हून अधिक जागा मागत आहे. तर, एडीएमके भाजपाला २३हून अधिक जागा देण्यास नकार देत आहे. डीएमडीके पक्षही २०हून अधिक जागांची मागणी करत आहे. मात्र, एडीएमके त्यांना १५ जागा देण्याबाबत विचार करत आहे.

निवडणुकीला अवघा एक महिना शिल्लक असतानाही तामिळनाडूमधील दोन मुख्य पक्ष आपापल्या साथीदारांसोबत अजूनही जागावाटपाबाबतच चर्चा करत आहेत. या दोन्ही पक्षांना जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवायची आहे, त्यामुळे इतर पक्षांना जास्तीत जास्त प्रमाणात घासाघीस करावी लागणार आहे.

हेही वाचा :स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपाची बाजी; पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या जनतेचे मानले आभार

ABOUT THE AUTHOR

...view details