महाराष्ट्र

maharashtra

Laxmi pooja 2023 : दिवाळीत पुजेसाठी पुजारी मिळत नसतील तर, 'अशा' प्रकारे लक्ष्मी-गणेशजींची करा पुजा

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 12, 2023, 7:27 AM IST

Updated : Nov 12, 2023, 9:56 AM IST

Diwali 2023 : सर्वजण दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहेत. व्यस्त वेळापत्रकामुळं अनेकांना पुजेसाठी पुजारी मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही लक्ष्मी गणेश यांची पूर्ण पूजा घरी करू शकता.

Diwali 2023
Diwali 2023

ज्योतिषी शिवकुमार शर्मा

नवी दिल्ली/गाझियाबादLaxmi pooja 2023 : आज दिवाळीत लक्ष्मी-पूजनाचे अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार दिवाळीला प्रत्येक घरात देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. यासोबतच कारखान्यात किंवा दुकानातही लक्ष्मी-गणेशाची पूजा केली जाते. अशा परिस्थितीत कधी-कधी पुजेसाठी पुजारी मिळणे थोडे कठीण होऊन बसते. त्यामुळं आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः लक्ष्मी गणेशाची पूजा करू शकता.

पुजेच साहित्य : ज्योतिषी शिवकुमार शर्मा यांनी सांगितलं की लक्ष्मी गणेशजींच्या पुजेसाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यासाठी तांदूळ, कलव, पान, सुपारी, लवंगा, वेलची, अगरबत्ती, फळं, मिठाई, फुलांच्या माळा, आंब्याची पाने, देशी तूप, मोहरीचं तेल, लक्ष्मी गणेशाची मूर्ती, चांदीचं किंवा सोन्याचं नाणं, मातीची भांडी, 11 किंवा 21 दिवे, खीर, बताशा, श्री यंत्र, कुबेर यंत्र, नारळ आणि पंचामृत हे साहित्या पुजेसाठी लागेल.

पुजेची पद्धत : आपले शरीर शुद्ध करण्यासाठी सर्वप्रथम शरीराच्या अवयवांना स्पर्श करा. त्यानंतर आपल्या हातात पाणी आणि फुलं ठेवा. त्यानंतर म्हणा की मी (माझ्या गोत्राचे नाव) गोत्रात जन्मलेल्या (माझं नाव) आज कार्तिक अमावस्या दिवाळीच्या सणावर, आई महालक्ष्मी आणि भगवान गणेशाची आनंदासाठी, घरात सुख-समृद्धी आणि कुटुंबाचं कल्याण व्हावं यासाठी मी पूजा करत आहे. असं म्हणत गणेशाच्या चरणी पाणी आणि फुले सोडावीत.

लक्ष्मीची पुजा केल्यानंतर घंटा आणि शंख वाजवू नका : आरतीनंतर देवी-देवता विश्रांती घेतात, असं मानलं जातं. अशा परिस्थितीत आरतीनंतर शंख आणि घंटा वाजवल्यानं त्यांच्या झोपेत अडथळा निर्माण होतो. म्हणूनच आरतीनंतर कधीही शंख किंवा घंटा वाजवू नये. घंटा वाजवणं म्हणजे घरातून लक्ष्मीला निरोप देणं. आरतीपूर्वीच शंख वाजवावा. एवढेच नाही तर शंख फुंकल्यानंतर तो धुवून मंदिरात ठेवावा.

हेही वाचा :

  1. Narak Chaturdashi 2023 : नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाचं काय आहे महत्त्व; जाणून घ्या
  2. Saitirtha Theme Park Laser Show: साईतीर्थ थीम पार्क लेझर शोचं उद्घाटन; लेझर शोमुळे शिर्डीच्या लौकिकात भर - सदाशिव लोखंडे
  3. Diwali 2023 : फटाक्यांमध्येही विश्वचषकाची झलक, बॅट-बॉलच्या आकारातील फटाकेही आले बाजारात
Last Updated : Nov 12, 2023, 9:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details