धनबाद -जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (District and Sessions Judge) उत्तम आनंद (Judge Uttam Anand) रोजच्याप्रमाणे बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यात गेले होते. त्यादरम्यान त्यांना रिक्षाने ठोकले. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन खाली पडले. एका रिक्षा चालकाने त्यांना SNMMCH पोहोचवले. तेथेच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यात त्यांना रिक्षाने ठोकर दिलेली दाखवत आहेत. उत्तम आनंद रंजय हत्याकांडांची सुनावणी करत होते.
सकाळी आनंद दररोज मॉर्निंग वॉकला जात होते. ते रणधीर वर्मा चौक येथील न्यायाधीशांसाठी असलेल्या गोल्फ मैदानापर्यंत मॉर्निंग वॉक करायचे. बुधवारीही त्यांनी सकाळी नेहमीप्रमाणे वॉक केला. मात्र, सकाळी सात वाजता परत आले नाहीत. याबाबतीत कुटुंबियांनी याची माहिती स्थानिक पोलीसांना दिली. याची माहिती मिळताच, पोलीसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलीस ठाण्याला SNMMCH मध्ये एक प्रेत मिळाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलीस दवाखान्यात पोहोचले. न्यायाधीशाच्या अंगरक्षकाने प्रेताची ओळख पटवली. उत्तम आनंद यांच्या डोक्याला गंभीर जखम होती. आणि रक्त येत होते. यानंतर पोलीस पुढील तपास केला.
रंजय हत्याकांड वर सुनावणी करत होते उत्तम आनंद
न्यायाधीश उत्तम आनंद यांनी सहा महिन्यापूर्वी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा पदभार स्विकारला होता. याआधी ते बोकारोचे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश होते. याआधी ते प्रसिध्द रंजय सिंह हत्याकांडाची सुनावणी करत होते. रंजय सिंह धनबादचे आणि झरियाचे माजी नेते संजीव सिंह यांचे निकटवर्तीय मानले जात होेते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नेमबाज अभिनव सिंह और रवि ठाकुर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. रंजय सिंह प्रकरणी त्यांची हत्या केल्याचे बोलले जात आहे.