आपली खाद्यसंस्कृती तब्बल पाच हजार वर्षे जुनी आहे. पण हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कुठलेच लिखित पुरावे उपलब्ध नाहीत. खरं तर युरोपामध्ये खाद्य इतिहासाच्या अभ्यासाला सुरुवात होण्याआधी भारतात १९४० च्या दशकात त्याला सुरूवात झाली. मात्र त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. भारतात 28राज्ये आणि 8 युनियन केंदर् शासित प्रदेश आहेत. प्रत्येकाची खाद्य संस्कृती वेगळी आहे. भारत सध्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत आहे ( Indian Independence Day ). त्यामुळे आज आपण काही राज्यातील खाद्यसंस्कृती विषयी जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती मराठी खाद्यप्रकार म्हणजे भारतातील महाराष्ट्र राज्यातील खाद्यप्रकार ( Maharashtra Food culture ). स्वयंपाक शैली, परंपरा आणि पाककृती यांचा समावेश त्यात महाराष्ट्राची एक खासियत म्हणजे पुरणपोळी ( Maharashtra Food ) . कोणत्याही मराठी सणावाराच्या वेळी महाराष्ट्रीय घरात गोडाधोडाचा बनणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. हा पदार्थ जितका दिसायला व खायला चांगला असतो, तितका तो करायला कठीण असतो. पुरणपोळीबरोबर तूप घातलेली गुळवणी म्हणजे खवय्यांसाठी एक मेजवानीच असते. पुरणपोळीत आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे मांडा. हा खापरावर बनवला जातो.महाराष्ट्रात विविध प्रकारचे लोक रहातात. त्यांच्या एकत्रिक जीवनाप्रमाणेच विविध पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो तो म्हणजे मिसळ. महाराष्ट्रात चुलीवरची मिसळ हा एक विशेष पारंपारिक चव असणारा पदार्थ आहे. उकडलेल्या बटाट्याची भाजी व बेसनाचे एकत्र तळून बटाटावडा तयार केला जातो. हा अतिशय साधा व लवकर तयार होणारा पदार्थ आहे. यातील सर्व पदार्थ लगेच मिळणारे असल्याने बटाटावडा महाराष्ट्रात कोठेही मिळतो. शेंगदाण्याची चटणी किंवा तळलेल्या हिरव्या मिरच्या वडापावला एक वेगळीच चव आणतात. काही पदार्थ ऋतुनुसार सुद्धा बनतात. आमरस उन्हाळ्यात, पावसाळ्यात उसाच्या रसाची पोळी. काही पदार्थ विशिष्ट सणांसाठी राखीव आहेत. सण व महोत्सव पारंपारिक असतात. त्यावेळचे पदार्थ वेगळे असतात. उदा. मोदक. गणेश चतुर्थीच्या वेळी हे बनवले जातात. नारळ आणि गूळ यांचे मिश्रण तांदुळाच्या पिठीचे कवच करून आत भरले जातात. आत भरले जाणाऱ्या पदार्थांना सारण म्हणतात. याचे गोड आणि तिखट असे दोन प्रकार असतात. नेहमीचे उकडीचे,तळणीचे, सारणाचे गोड मोदक आणि दुसरे रश्श्यातील मोदक, मोदकाची आमटी अशा प्रकारचे ही मोदक बनतात.
गुजराती खाद्यसंस्कृतीभारतीय खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे ( Gujarati food culture ) . पण गुजराती खाद्यसंस्कृती जगभरात अधिक लोकप्रिय आहे ( Gujarati food ). सुरतमध्ये ‘लोचा’नावाचा एक खाद्यपदार्थ मिळतो. तो अगदी झटपट होतो. खमणसाठी जे साहित्य लागते तेच घेऊन ही पाककृती करतात. फक्त उकड काढल्यावर ती कुस्करून मिक्स केली जाते. आणि वरून टोमॅटो, शेव, कांदा, मसाला वगैरे घालून ‘लोचा’ हा पदार्थ केला जातो. वडोदरा शहरातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घ्यायचा ठरवला तर तिथे भाकरवडी प्रसिद्ध आहे. भाकरवडी महाराष्ट्राची की गुजरातची यावर खूप चर्चा होतात. वडोदऱ्यामध्ये ‘जगदीश फरसाण’ नावाचं प्रसिद्ध दुकान आहे. तर महाराष्ट्रात पुण्यातील रघुनाथराव चितळे प्रसिद्ध आहेत. अहमदाबाद शहरामध्ये ‘शेव खमणी’ प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील उसळ पाव, मिसळ पावच्या जवळ जाणारी ती पाककृती आहे. सुरतमधील ‘उंधियू’ हा पदार्थ प्रसिद्ध आहे. सुरतला आलेल्या खवय्यांचा ‘उंधियू’ आणि ‘लोचा’ या दोन पाककृती चाखल्याशिवाय तिथून पाय निघत नाही. महाराष्ट्रात करंजी ही पाककृती प्रसिद्ध आहे, तिला गुजरातमध्ये ‘घुगरा’ म्हणतात. नाव वेगळं पण पाककृती सारखीच आहे. गुजराती थाळीमध्ये रोटी सब्जी, दाल (तुरीची डाळ) आणि चावल या चार प्रमुख गोष्टी असतात. गुजराती लोकांमध्ये दिवसानुसार पाककृती ठरवल्या जातात. बुधवार असला तर मुगाची पाककृती, शनिवार असेल तर उडद की दाल किंवा कढी बनते.