उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुष्करमध्ये घेतले ब्रह्मदेवाचे दर्शन अजमेर (राजस्थान) DCM Devendra Fadanvis in Pushkar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज त्यांनी तिन्ही पुष्करला ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले. तसेच यानंतर त्यांनी पुष्करच्या पवित्र तलावात प्रार्थनाही केली. यावेळी त्यांच्यासोबत राजस्थान भाजपच्या सहप्रभारी विजया रहाटकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी हेही उपस्थित होते. ब्रह्मदेवाचे दर्शन घेतल्यानंतर हे तिन्ही नेते विमानाने सरवारला रवाना झालेत. (DCM Devendra Fadanvis in Rajsthan)
राजस्थानात भाजपची परिवर्तन संकल्प यात्रा : भाजपाची परिवर्तन संकल्प यात्रा राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात दाखल झालीय. ही यात्रा केकरी येथे थांबली होती. आज ही यात्रा केकडी ते सरवार, नंतर नशिराबाद, श्रीनगर, सिलोरा मार्गे किशनगड येथे पोहोचेल. त्यानंतर सायंकाळी उशिरा अजमेरला दाखल होईल. या यात्रेत केसरगंज येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राजस्थान भाजपच्या सहप्रभारी विजया रहाटकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी हेलिकॉप्टरनं पुष्करला पोहोचले. पुष्करचे आमदार सुरेश सिंह रावत यांच्यासह अनेक स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांचे हेलिपॅडवर स्वागत केले. यानंतर तिन्ही भाजप नेत्यांनी ब्रह्मदेवाच्या मंदिरात दर्शन घेतले. ब्रह्मदेवाचे दर्शन घेतल्यानंतर तिन्ही नेते पुष्करच्या पवित्र तलावावर पोहोचलं तेथेही त्यांनी प्रार्थना केली.
फडणवीसांनी राजकीय प्रश्नांवर बोलणे टाळले : यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुष्कर हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. विश्वपिता ब्रह्मदेवाचे अद्वितीय मंदिर येथे आहे. आयुष्यात एकदा तरी येथे येऊन विश्वपिता ब्रह्मदेवाचे दर्शन घ्यावे अशी ईच्छा प्रत्येक व्यक्तीच्या मनात इच्छा असते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मी जगपिता ब्रह्माजींचे दर्शन घेतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ब्रह्मदेवाचा आशीर्वाद असून आगामी काळात राजस्थानमध्ये भाजपलाही ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. मात्र यावेळी फडणवीसांनी राजकीय प्रश्नांवर बोलणे टाळले. पुष्कर येथे भेट दिल्यानंतर तिन्ही नेते हेलिकॉप्टरने केकरीला रवाना झालेत.
गेहलोत सरकारवर हल्लाबोल : केकरी येथे पोहोचल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आज भारताचा गौरव केलाय. आज भारत विकसित देशांच्या श्रेणीत येऊ लागलाय. राजस्थानात काँग्रेस सरकारच्या काळात शेतकरी, व्यापारी, तरुणांसह प्रत्येक वर्ग त्रस्त आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी राजस्थानातील गेहलोत सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्यात गुन्हेगारी शिगेला असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत मिशन 2030 बद्दल बोलत आहेत. राजस्थानमध्ये महिलांवरील बलात्काराच्या घटना दररोज समोर येत आहेत. पेपरफुटी, गुन्हे, बलात्कार यामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. जनता काँग्रेस सरकारला कंटाळली असून येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचं सरकार येणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा :
- Devendra Fadnavis : निवडणूक शपथपत्र प्रकरण; देवेंद्र फडणवीसांची नागपूर न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- Sushma Andhare : उपमुख्यमंत्र्यांकडून गृहखात्याच्या वापर.... ; सुषमा अंधारेंची टीका
- Bhaskar Jadhav On BJP : भास्कर जाधवांचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, फक्त ईडी, सीबीआय...