मोतिहारी ( बिहार ) : बिहारमधील मोतिहारीमध्ये ट्रेनला आग लागली. रक्सौल-नरकटियागंज रेल्वे सेक्शनवरील भेलवा स्टेशनजवळ डेमू ट्रेनच्या इंजिनमध्ये अचानक आग लागली. त्यामुळे ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. ट्रेन रक्सौल जंक्शनहून नरकटियागंजला जात होती. ही घटना पहाटे साडेपाचची असल्याचे सांगण्यात येत आहे.
Bihar Train Engine Fire : बिहारमध्ये रेल्वेच्या इंजिनला लागली आग.. वाहतूक विस्कळीत - मोतिहारी में ट्रेन में आग लगी
डेमू ट्रेनच्या इंजिनला आग लागण्याचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, इंजिनमधील आग पसरली नाही. त्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी रक्सौलचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी, या घटनेमुळे रक्सौल-नरकतियागंज रेल्वे सेक्शनवरील गाड्यांची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे.
डेमू ट्रेनच्या इंजिनला आग :आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, इंजिनची आग पसरली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपी रक्सौलचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी, या घटनेमुळे रक्सौल-नरकतियागंज रेल्वे सेक्शनवरील गाड्यांची वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली आहे. रक्सौल-नरकतियागंज मार्गे सिक्टा रेल्वे सेक्शन मार्गे ट्रेन क्रमांक 05541 च्या भेलवा स्टेशनजवळ, 39 पुलाजवळ ट्रेनच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :कोल्हापूरमधील रेल्वे स्टेशनवरील रेल्वेला आग; एक डबा जळून खाक