नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज एक मोठी कारवाई केली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन संशयित सदस्यांना त्यांनी अटक केली आहे. या दोघांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एक मोठा कट उधळण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
अब्दुल लतीफ आणि मोहम्मद अशरफ अशी या दोघांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि ख्वाडा प्रांतातील रहिवासी आहेत. त्यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन सेमी-ऑटोमॅटिक पिस्तुलं आणि दहा जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.
'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवासी
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, सराय काले खांमधील मिलेनियम पार्कच्या जवळ सापळा रचण्यात आला. पोलिसांनी रचलेल्या या सापळ्यात हे दोन्ही अतिरेकी अडकले, आणि त्यांना अटक करण्यात आली. हे दोघेही जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि ख्वाडा प्रांतातील रहिवासी आहेत.
कर्नाटक, पश्चिम बंगालमध्येही कारवाई..
गेल्या आठवड्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दहशतवादीविरोधी मोहिमेत मोठे यश प्राप्त झाले आहे. एनआयएच्या कोलकाता ब्रँचने कर्नाटकमधून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती. हा दहशतवादी हा दहशतवादी पश्चिम बंगालमधल्या हनीट्रॅप प्रकरणातील तानिया प्रवीणच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.
हेही वाचा :कानपुरमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीची अंधश्रद्धेतून हत्या, अत्याचार केल्याचेही निष्पन्न