नवी दिल्ली : दिल्लीतील विविध भागातील उद्याने, बाजार आणि वसाहतींच्या भिंतींवर चिकटवलेल्या या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. दिल्ली पोलिसांचे विशेष सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, पोस्टर्सवर प्रिंटिंग प्रेसचा कोणताही तपशील नव्हता. प्रिंटिंग प्रेस अॅक्ट आणि प्रॉपर्टी अॅक्ट या कायद्यान्वये हे सर्व एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सीपी दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, आम आदमी पार्टीच्या कार्यालयातून निघालेली एक व्हॅन अडवण्यात आली आहे.
अटक आरोपींची चौकशी :काही पोस्टर्स जप्त करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही पोस्टर्स कोणाच्या सांगण्यावरून लावण्यात आली आणि त्यांचा उद्देश काय होता? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक या अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत आहे. त्यांच्याकडून या पोस्टर्समागे आम आदमी पक्षाचे किंवा अन्य विरोधी पक्षांचे नेते आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. खरेतर पोस्टर्सवर छापखान्याचा तपशीलच नाही, त्यामुळे पोलिसांचा संशय आधीच बळावला आहे.
पोस्टर्स कुठे छापले गेले आहेत :हे निनावी पोस्टर्स कोणत्यातरी राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या नेत्यांच्या प्रेरणेने लावले आहेत, असे मानले जात होते. जेव्हा कोणतेही पोस्टर छापले जाते, तेव्हा प्रिंटिंग प्रेसचा संपूर्ण तपशील त्यावर नोंदविला जात असतो., जेणेकरून या तपशीलाच्या आधारे गरज पडल्यास हे पोस्टर्स कुठे छापले गेले आहेत याचा शोध घेता येतो, परंतु जेव्हा कोणी हे जाणून बूजून करते तेव्हा ते छापताना ते तपशील टाकत नाहीत. त्यामुळे पोस्टर छापणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलीसांना सहजपणे पोहोचू शक्य नसते.
जपानच्या पंतप्रधानांशी भेट : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. हा पाणीपुरी खातानाचा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. यावेळी जपानच्या पंतप्रधानांनी भारताच्या पंतप्रधानांना या वर्षी मे महिन्यात हिरोशिमा येथे होणाऱ्या जी 7 नेत्यांच्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
PM Narendra Modi News: दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर, १०० गुन्हे दाखल, ६ अटकेत - दिल्ली पोलिसांचे पथक
दिल्ली पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टर लावल्याप्रकरणी एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
पंतप्रधान मोदी
Last Updated : Mar 22, 2023, 12:11 PM IST