सरकारने आमचे म्हणणे न ऐकल्यास संपूर्ण दिल्लीचे प्रवेशद्वार रोखले जाईल, असे माध्यमांशी बोलताना शेतकरी संघटनानी म्हटलं.
'दिल्ली चलो' आंदोलनाचा पाचवा दिवस, उद्यापासून देशभर आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; पाहा LIVE अपडेट्स..
17:28 November 30
17:28 November 30
हरयाणामध्ये शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरीही आंदोलन शिगेला पोहोचले आहे. कृषी कायद्यामुळे कॉर्पोरेटला फायदा होईल, असे भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले
10:37 November 30
देशभरात आंदोलन करण्याचा इशारा..
सिंघू सीमेवर शेतकऱ्यांची एक बैठक पार पडली. यानंतर एक डिसेंबरपासून देशभरात आंदोलन सुरू करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणासोबतच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे शेतकरीही येत आहेत.
10:36 November 30
सरकारकडून पुन्हा चर्चेचा प्रस्ताव..
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. आंदोलक शेतकरी बुराडीमधील मैदानात जाताच दुसऱ्या दिवशीपासून चर्चांना सुरूवात होईल, असे ते म्हणाले.
10:34 November 30
शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करु द्या - आम आदमी पक्ष..
आम आदमी पक्षाचे नेता राघव चड्ढा यांनी शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलन करु देण्याची मागणी केली आहे. दिल्लीमध्ये हव्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी केले होते.
07:57 November 30
तर दिल्लीत येणारे मार्ग बंद करु..
शेतकऱ्यांनी सशर्त चर्चेची मागणी फेटाळली आहे. चर्चेसाठी अटी ठेवणे हाच शेतकऱ्यांचा अपमान असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आज दिल्लीत येणारे पाचही प्रवेशमार्ग बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
07:56 November 30
जेपी नड्डांच्या घरी पार पडली उच्चस्तरीय बैठक..
रविवारी रात्री भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या घरी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. शेतकरी आंदोलनाशी संबंधित या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते.
07:12 November 30
शेतकऱ्यांंच्या 'दिल्ली चलो' आंदोलनाचा पाचवा दिवस..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची चर्चेची मागणी, तसेच बुराडीमधील मैदानात आंदोलन हलवण्याची मागणी शेतकऱ्यांनी फेटाळली आहे. अटी घालून करण्यात येणाऱ्या चर्चा आपल्याला मान्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.