नवी दिल्ली -भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी ( Tajinder Bagga Arrested ) अटक केली होती. त्यानंतर आता त्यांचा ताबा पुन्हा दिल्ली पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलीस बग्गांना घेऊन दिल्लीकडे रवाना झाले ( Tajinder Bagga Back To Delhi ) आहे.
यापूर्वी अटकेसाठी पंजाब पोलीस आले होते -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांच्या विरोधात पंजाबमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Punjab Police ) त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस यापूर्वी त्यांच्या अटकेसाठी आले होते असही यावेळी म्हटले आहे.
अरविंद केजरीवालांना धमकवल्याप्रकरणी गुन्हा -बग्गा यांच्याविरोधात १ एप्रिल रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. पंजाब पोलिसांनी प्रक्षोभक विधाने करणे, शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि गुन्हेगारी धमकावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ( Tajinder Bagga Arrested ) यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटावरील वक्तव्यावर दिल्ली भाजप नेते तजिंदर सिंग बग्गा यांनीही हल्लाबोल केला होता, त्यावरून ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
एफआयआरमध्ये बग्गा यांच्या वक्तव्याचा उल्लेख - ३० मार्च रोजी दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजप युवा मोर्चाच्या निदर्शनादरम्यान केजरीवाल यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख आहे. भाजप युवा मोर्चाच्या नेत्याने दावा केला होता की पंजाब पोलिसांची एक टीम त्यांना अटक करण्यासाठी राजधानीत त्याच्या घरी पोहोचली होती. परंतु, त्यांना त्यांच्याविरुद्ध कोणत्याही एफआयआरची माहिती नव्हती.