महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सीमा शुल्क प्रक्रियेत दोन दिवस अडकले ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर; निधी गोळा करून केली होती आयात

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भारतात पाठविण्यासाठी नेदरलँड सरकारने सर्व प्रक्रिया वेगवान केली होती. त्यासाठी नेदरलँड सरकारने फक्त २४ तासांमध्ये सर्व परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मशिन भारतामध्ये वेळेवर पोहोचू शकल्या आहेत.

oxygen equipment
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर

By

Published : May 7, 2021, 10:56 PM IST

Updated : May 8, 2021, 2:44 PM IST

भोपाळ -कोरोनाबाधितांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित होण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक, समाजसेवी संस्था तसेच प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहेत. मात्र, सीमा शुल्क विभागाचे काम अजूनही कासवगतीने सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. इंदूर येथील सीए संघटनेने नेदरलँडसमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मागविले आहेत. मात्र, सीमा शुल्क विभागामुळे या जीवरक्षक मशिन्स दोन दिवस मुंबई विमानतळावर पडून राहिल्या होत्या.

इंदूरमध्ये कोरनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने सीए संघटनेने निधी गोळा केला. हा निधी वापरून संघटनेने नेदरलँडवरून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मागविले. हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर शहरातील रहिवाशांना वाटप करण्याचे संघटनेने नियोजन करण्यात आले.

हेही वाचा-कोरोनाने संकट; सुमारे १५.२० कोटी लोकांचा अन्न असुरक्षेबरोबर सामना

विशेष म्हणजे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर भारतात पाठविण्यासाठी नेदरलँड सरकारने सर्व प्रक्रिया वेगवान केली होती. त्यासाठी नेदरलँड सरकारने फक्त २४ तासांमध्ये सर्व परवानग्या देण्यात आल्या होत्या. त्यामुळे या मशिन भारतामध्ये वेळेवर पोहोचू शकल्या आहेत. मात्र, सीमा शुल्काचे किचकट नियमांमुळे मशीन दोन दिवस मुंबई विमानतळावर राहिल्या होत्या.

हेही वाचा-गोपनीयतेचे धोरण अपडेट नसेल तरी व्हॉट्सअपचे अकाउंट राहणार सुरू

ट्रकमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणतानाही द्यावी लागली लाच-

इंदूर सीए संघटनेनेही सीमा शुल्कापोटी तीन लाख रुपये भरले आहेत. तसेच इंदूरपर्यंतचा ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या वाहतुकीचा खर्चही केला आहे. हा ट्रक मार्गात असताना लाच मागण्यात आली. त्यासाठीही १ हजार रुपयांची लाच देण्यात आल्याचा दावा सीए संघटनेने केला आहे. हे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर इंदूर शहरांमध्ये पोहोचले आहेत. इंदूर सीए संघटनेकडून सर्वसामन्यांना या कॉन्स्ट्रेटरचे वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, देशात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मिळणे कठीण होत असल्याने विदेशातून आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Last Updated : May 8, 2021, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details