नवी दिल्ली- खासदार आणि आमदारांविरोधातील प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडे मोठ्या प्रमाणात प्रलंबित प्रकरणे आहेत. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयातील पीठाचे मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश एन. व्ही. रामणा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमदार-खासदारांच्या विरोधातील तपास प्रकरणात दिरंगाई होण्यामागे कारणही तपास संस्थांनी दिले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.
राजकीय नेत्यांविरोधात वेगाने खटले चालवावित व त्यांना निवडणूक लढविण्यावर बंदी घालावी, अशी याचिका भाजपचे सदस्य आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात 41 खासदार आणि 71 विधानसभा व विधानपरिषदेचे आमदार यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचा अहवाल अॅमिस्क क्युरी विजय हंसारिया यांनी दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडे जन्मठेपेसारख्या 58 गंभीर प्रकरणासह एकूण 151 प्रकरणे प्रलंबित आहेत. तपास संस्थांकडून 10 ते 12 वर्षांमध्ये चार्जशीटही दाखल झाली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. प्रकरणे निकालात काढण्यासाठी कशामुळे उशीर होत आहे, याचे कारणही नव्हते.
हेही वाचा-राहुल गांधींना मालमत्तांचे रोखीकरण समजते का? निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना खोचक टोला
सीबीआय न्यायालयात 300 ते 400 प्रकरणे