चंदीगड : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबाला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये मुसेवालाच्या पालकांना २५ एप्रिलपर्यंत नोकरीवरून काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ईमेलमध्ये अभिनेता सलमान खानचाही उल्लेख करण्यात आला आहे. मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
धमकीच्या ईमेलमध्ये सलमान खानचाही उल्लेख :पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत तपास सुरू केला आहे. हा ईमेल राजस्थानमधील जोधपूर येथून आल्याचे तपासात समोर आले आहे. राजस्थानमध्ये छापा टाकला असता, हा ईमेल अवघ्या 14 वर्षांच्या मुलाने केल्याचे उघड झाले. ईमेलमध्ये या मुलाने मुसेवाला यांच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या मुलाने कोणाच्या सांगण्यावरून हा ईमेल पाठवला या बाबत चौकशी करण्यासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
धमकी देणाऱ्यास अटक केली : सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांना ईमेलद्वारे धमकी देणाऱ्या व्यक्तीला मानसा पोलिसांनी अटक केली आहे. एसएसपी गौरव तुरा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने सिद्धू मुसेवालाच्या वडिलांना ईमेलद्वारे धमकी दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या समन्वयाने आरोपी महिपाल हा जोधपूर, राजस्थान येथील रहिवासी आहे. त्याला 2 मोबाईलसह अटक करण्यात आली आहे. बहादूरगड येथून अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.