बालाघाट (म.प्र) -साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 युवकांचा मृत्यू ( Well cleaning 5 youth died kudan balaghat ) झाल्याची घटना जिल्ह्यातील कुदान गावात घडली आहे. साफसफाई करत असताना विहिरीतील खालच्या भागात विषारी वायू गळती झाल्याने सर्व युवक बेशुद्ध झाले. गावकऱ्यांनी त्यांना कसेबसे विहिरीतून बाहेर काढले आणि बिरसा रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी 5 युवकांना मृत घोषित केले तर एका युवकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. मृतांमध्ये 3 सख्ख्या भावांचा समावेश आहे. विहिरीत कचरा जमा झाल्याने हे युवक साफसफाईसाठी उतरले होते.
साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 जणांचा मृत्यू, वायू गळतीने झाले होते बेशुद्ध - 5 youth died kudan
साफसफाईसाठी विहिरीत उतरलेल्या 6 पैकी 5 युवकांचा मृत्यू ( Well cleaning 5 youth died kudan balaghat ) झाल्याची घटना जिल्ह्यातील कुदान गावात घडली आहे. साफसफाई करत असताना विहिरीतील खालच्या भागात विषारी वायू गळती झाल्याने सर्व युवक बेशुद्ध झाले. गावकऱ्यांनी त्यांना कसेबसे विहिरीतून बाहेर काढले आणि बिरसा रुग्णालयात नेले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानांनी दुख व्यक्त केले -मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पाच तरुणांच्या अकाली निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिवराज यांनी मृतांच्या आत्म्याला शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या मुलाची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी केली. महसूल पुस्तिकेतील परिपत्रकातील तरतुदींनुसार मदत प्रकरण तयार करून पीडित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बालाघाट जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. गिरीशकुमार मिश्रा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना जिल्हा रेडक्रॉस सोसायटीकडून प्रत्येकी 20 हजार रुपयांची मदत दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदतीची रक्कमही दिली जाईल. यासाठी पीएम रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ मदत रकमेची कार्यवाही केली जाईल. तामेश्वर बिलसरे (वय 20), पुनीत खुरचंदे (वय 32), पन्नू (वय 28), मन्नू खुरचंदे (वय 20), तीजलाल गोंड (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 5 जणांमध्ये 3 सख्खे भाऊ आणि 2 शेजारी आहेत. जखमींना बिरसा रुग्णालयात नेऊन पोलीस प्रशासन तपासात गुंतले आहे.
हेही वाचा -चक्क ट्रेनवरुन प्रवास! दारूच्या नशेत तरुणाचा धोकादायक प्रवास; व्हिडीओ व्हायरल