जयपूर - तुम्हाला कानामध्ये ब्ल्यूटूथ लावण्यासी सवय असेल तर ही चिंता वाढविणारी बातमी आहे. राजस्थानमधील चौमू या ठिकाणी धक्कादायक घटना घडली आहे. कारण, ब्ल्यूटूथ एअरफोनचा कानात स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
जयपूरमधील चौमूच्या परिसरातील उदयपुरिया गावात तरुणाच्या कानात ब्ल्यूटूथ एअरफोनचा स्फोट झाला. या घटनेत तरुणाच्या दोन्ही कानांना जखम झाली आहे. तरुणाला जखमी अवस्थेत सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा-न्यायाधीशांच्या संरक्षणाकरिता सीबीआयने काहीही केले नाही- सर्वोच्च न्यायालय
उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. राकेश नागर असे मृताचे नाव आहे. डॉक्टरांनी तरुणाचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. रुग्णालयाचे डॉ. एल. एन. रुंडला यांच्या माहितीनुसार राकेश हा कानात ब्ल्यूटूथ एअरफोन लावून बोलत होतो. अचानक स्फोट होऊन दोन्ही कानात एअरफोन फुटले.