जमुई : लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना बिहारमधील जमुई येथे बुधवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थाळावर पोहोचून मृतदेह विहिरीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र नातेवाईकांनी सासरच्यांनी बेदम मारहाण करुन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकल्याचेही नातेवाईकांचे मत आहे. सलमा खातून असे मृत विवाहितेचे नाव आहे. विशेष म्हणजे सलमाने प्रेमविवाह केल्याची माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
मृत्यूच्या एका दिवसाआधी झाले होते लग्न : मौरा गावातील रहिवासी मोहमद मंजूर आलम अन्सारी यांची मुलगी सलमा खातून हिचे गावातील वकील अन्सारी यांचा मुलगा सनाऊल अन्सारीवर प्रेम होते. दोघांच्या कुटुंबीयांनाही याबाबतची माहिती होती. त्यानंतर सनाऊल अन्सारीने लग्नासाठी सलमाकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर सलमा खातूनने वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन सनाऊल अन्सारीला दिले होते. त्यानंतर त्यांनी १३ फेब्रुवारीला कोर्टात लग्न केल्याची माहिती सलमाच्या नातेवाईकांनी दिली. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सलमाचा मृतदेह विहिरीत आढळला आहे.
खून करुन विहिरीत फेकला मृतदेह : कोर्ट मॅरेज केल्यानंतर सलमाने सनाऊलकडे कोर्टाच्या पेपरची मागणी केली. त्यामुळे सनाऊल अन्सारीने कोर्टाचे पेपर देण्यास नकार दिला. लग्नाच्या कागदपत्रावरुनच पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाले. पती सनाऊल अन्सारी, सासरा वकील अन्सारी, सासू मुन्नी खातून आणि तीन मेहुण्या व इतरांनी सलमाला बेदम मारहाण केल्याचा आरोप सलमाच्या नातेवाईकांनी केला. इतकेच नाही तर सलमाचा गळा दाबून खून करुन मृतदेह विहिरीत टाकून पलायन केल्याचा आरोपही सलमाचे नातेवाईक करत आहेत. याबाबत पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नातेवाईकांनी केला खुनाचा आरोप :सलमा खातून आणि सनाऊल यांनी प्रेमविवाह केला होता. त्यातच सलमाने सनाऊनकडे लग्नाचे कागदपत्र मागितल्याने त्यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन सलमा खातूनला बेदम मारहाण करुन तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप सलमाच्या नातेवाईकांनी केला आहे. सलमाचा पती सनाऊल अन्सारी, सासरा वकील अन्सारी, सासू मुन्नी खातून यांच्यासह अन्य नातेवाईकांनी सलमाला मारहाण केल्याचा आरोपही या नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा - Thief Slept In Temple : चोरी करण्यासाठी मंदिरात घुसला चोर; दरवाजा न उघडता आल्याने तेथेच झोपला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या