बलिया (उत्तर प्रदेश) Dead Body In Suitcase : उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये रविवारी एका शेतात सुटकेसमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे तुकडे आढळले. आजूबाजूच्या लोकांनी याची माहिती दिल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. फॉरेन्सिक टीमनंही घटनास्थळ गाठून पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या मृतदेहाची ओळख पटलेली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
गावकऱ्यांनी माहिती दिली : एसपी एस आनंद यांनी सांगितलं की, रविवारी सकाळी गावकऱ्यांना येथील एका शेतात एक लाल रंगाची सुटकेस दिसली. दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येची घटना आठवून गावकऱ्यांना येथेही काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटत होती. त्यामुळे ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर परिक्षेत्र अधिकाऱ्यासह पोलीस अधीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सुटकेस उघडली तेव्हा आतील दृश्य भयानक होतं.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला : कुजलेल्या मृतदेहाचे अनेक तुकडे सुटकेसमध्ये पडले होते. सुटकेसमधून एवढा दुर्गंधी येत होता की तिच्या जवळही उभं राहणं कठीण झालं होतं. हा मृतदेह मुलीचा असल्याचं सांगण्यात येत आहे, जिचं अंदाजे वय १५ ते १६ वर्ष होतं. पोलिसांना घटनास्थळावरून कोणताही सुगावा मिळालेला नाही ज्यावरून मुलीची ओळख पटू शकेल. मृतदेह कोणाचा आहे? तो इथपर्यंत कसा पोहोचला? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा मुख्यालयात पाठवला.
मृतदेहाचे तुकडे कुजलेले आहेत : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुटकेसमध्ये मृतदेह कोणाचा आहे हे सध्याचं सांगणं कठीण आहे. मृतदेहाचे तुकडे पूर्णपणे कुजलेले आहेत. मृतदेहाच्या गळ्यात पुष्पहार आहे. सुटकेस महामार्गाच्या बाजूला असलेल्या झुडपात फेकली असावी, असा संशय व्यक्त केला जातोय. एसपी एस आनंद यांनी सांगितले की, फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा :
- Minor Girl Gang Rape : धक्कादायक! १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; पाचही आरोपी फरार
- Call Girl Cheated : 74 वर्षीय आजोबांना 'कॉल गर्ल' ची भेट पडली 30 लाख रुपयांना
- Rape in Agra : भयंकर! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन बलात्कार; तक्रार केल्यानं गरम चिमट्यानं जाळले पीडितेचे हात