महाराष्ट्र

maharashtra

दिशा रवीच्या अटकेप्रकरणी दिल्ली महिला आयोगाची पोलिसांना नोटीस

By

Published : Feb 16, 2021, 3:17 PM IST

Updated : Feb 16, 2021, 3:32 PM IST

दिल्लीच्या महिला आयोगाने सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

disha
disha

नवी दिल्ली -दिशा रवीच्या अटकेवरून देशात राजकारण सुरू झाले आहे. याप्रकरणी आता दिल्लीच्या महिला आयोगाने सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. आयोगाने पोलिसांना एफआयआरची प्रत, तिला स्थानिक न्यायालयात ट्रान्झिट रिमांडसाठी सादर न केल्याची कारणे आणि सविस्तर कारवाईचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

'अटक कायद्यानुसारच'

दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले, की हवामान कार्यकर्ती दिशाची अटक कायद्यानुसारच करण्यात आली आहे. २२ वर्षांच्या किंवा 50 वर्षांच्या व्यक्तीमध्ये कोणताही फरक केला जाऊ शकत नाही.

'टीका चुकीची'

येथे एका कार्यक्रमात आले असता ते पत्रकारांशी संवाद साधत होते. 22 वर्षीय कार्यकर्तीला अटक केल्यावरून सध्या पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अशाप्रकारची टीका चुकीची असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणार्‍या दिशाला रविवारी बेंगळुरू येथून अटक करण्यात आली.

Last Updated : Feb 16, 2021, 3:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details