महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारताच्या मोस्ट वाँटेड दाऊदवर विषप्रयोग? सोशल मिडियात दावा, पाकिस्तानात इंटरनेट बंद - is dawood ibrahim death

Dawood Ibrahim Hospitalized: भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याला पाकिस्तानातील कराची इथं विष दिल्याची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. दुसरीकडं पाकिस्तानमधील इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे.

Dawood Ibrahim Hospitalised
Dawood Ibrahim Hospitalised

By ANI

Published : Dec 18, 2023, 7:38 AM IST

Updated : Dec 18, 2023, 8:26 AM IST

नवी दिल्लीDawood Ibrahim Hospitalized : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानमध्ये विष दिल्याची चर्चा आहे. यामुळं दाऊदची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेला अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी, गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर अशा प्रकराच्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही. मात्र पाकिस्तानातील कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमध्ये इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आलीय.

कराचीमधील रुग्णालयात दाऊदला केलं दाखल : पाकिस्तानच्या सोशल मीडियात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची चर्चा आहे. तसंच दाऊद इब्राहिमला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा सोशल मीडियात दावा करण्यात आला. विष प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचंही बोललं जातंय. मात्र या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पाकिस्तानमधील महिला पत्रकाराचे ट्विट सोशल मीडियात व्हायरल झाले.

दाऊद इब्राहिम हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड : दाऊद इब्राहिम हा 1993 मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांमुळं कुप्रसिद्ध झाला होता. भारतानं त्याला मोस्ट वॉन्टेड यादीत ठेवलंय. त्याला फरार घोषित करण्यात आलंय. दाऊदला भारतात आणण्यासाठी अनेक प्रयत्न झाले आहेत. पाकिस्तानातील कराचीमध्ये तो आलिशान जीवन जगत असल्याचा दावाही करण्यात आला. तिथं त्याला सरकारचंही संरक्षण मिळालंय. यापूर्वी पाकिस्ताननं भारताचे दावे फेटाळले आहेत. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर हजारांहून अधिक जण जखमी झाले होते.

पाकिस्तानात इंटरनेट बंद : दाऊदला पाकिस्तानात विष दिल्याच्या बातम्या आल्यानंतर देशात खळबळ उडालीय. पाकिस्तानात इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमीही समोर आलीय. पाकिस्तानातील लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही सर्व्हर डाउन आहेत. याशिवाय एक्स (पुर्वीचं ट्विटर), फेसबुक, इन्स्टाग्राम देखील चालत नसल्याचा दावा केलाय.

हेही वाचा :

  1. Mumbai 1993 Blast : 1993 साखळी बॉम्बस्फोट घडवणारा देशद्रोही कुख्यात गुंड दाऊदला फासावर चढवा; पीडितेच्या मुलाची मागणी
  2. Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम टोळीला गुटखा कारखान्यासाठी मदत, न्यायालयाने 3 आरोपींना ठोठावली 10 वर्षाची शिक्षा
Last Updated : Dec 18, 2023, 8:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details