महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाषणानंतर 'अलविदा! मेरा समय खत्म होता है' असे म्हणताच शेतकरी नेत्याचा मृत्यू - datar singh Died

शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पंजाबमधील कीर्ति किसान यूनियनचे (पंजाब) प्रदेश अध्यक्ष दातार सिंग यांचे निधन झाले. दातार सिंग यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. ते अमृतसर पोहचल्यानंतर दातार सिंग यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दातार सिंग
दातार सिंग

By

Published : Feb 22, 2021, 4:15 PM IST

अमृतसर - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकरी सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शेतकरी आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारे पंजाबमधील कीर्ति किसान यूनियनचे (पंजाब) प्रदेश अध्यक्ष दातार सिंग यांचे निधन झाले.

अमृतसरमधील विरसा विहार येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. भाषण संपल्यानंतर अलविदा! मेरा समय खत्म होता है, असे म्हणत ते खुर्चीवर बसले. मात्र, अचानक खाली कोसळले. लागलीच तातडीने त्यांना अृमतसरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे.

दातार सिंग हे कृषी कायदे मागे घेण्याबाबतच्या अनेक निदर्शनांमध्येही सहभागी होते. त्यांनी अमृतसरमधील खालसा महाविद्यालयातून शिक्षण घेतले होते. दातार सिंग याचे भाऊ धनवंत सिंग यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्याचे दुसरे भाऊ अमृतसरच्या न्यायालयात कार्यरत आहेत. तर त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्यांची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियामध्ये राहतात. ते अमृतसर पोहचल्यानंतर दातार सिंग यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन -

कृषी कायद्यांविरोधात सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना ज्या कायद्यांवर आक्षेप असेल. त्या कायद्यातील तरतुदींचा उघडपणे विचार करण्यास सरकार तयार आहे, असे सरकारने म्हटलं आहे. तर तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी नाकारला आहे. तीन्ही कायदे रद्द करावीत. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details