मेष -जीवनात नातेवाईक आणि मित्रांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मित्रांवर पैसा खर्च होईल आणि त्याच्यापासून फायदाही होईल. फिरायला जाणे होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. प्रेमसंबंधांसाठी काळ चांगला आहे.
वृषभ -लव्ह लाईफमध्ये आज तुमचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही नवीन नातेसंबंधांची सुरुवात करू शकाल. आज तुमच्या जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होतील. तुमच्या दोघांमधील संबंध सौहार्दपूर्ण होतील. भेटवस्तू आणि आदराने मन प्रसन्न राहील.
मिथून - कोणतेही नवीन नाते सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. शरिरातील थकवा आणि आळस यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. पोटाशी संबंधित कोणत्याही आजाराने तुम्ही त्रस्त होऊ शकता. लव्ह लाईफमध्ये प्रतिकूल परिस्थिती राहील. मित्र आणि जोडीदार तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.
कर्क -राग आणि नकारात्मकतेमुळे तुमचे मानसिक आरोग्य प्रभावित होईल. म्हणून, धीर धरा. खाण्यापिण्याबाबत काळजी घ्या, अन्यथा तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होईल. नवीन नाती तयार होतील. आज नवीन काम सुरू करू नका. दुपारनंतर परिस्थिती बदलेल.
सिंह -आज लंच किंवा डिनर डेट, मनोरंजन आणि प्रवासात वेळ जाईल. जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी भेट फार आनंददायी राहणार नाही. लव्ह बर्ड्सला संयम ठेवावा लागेल. तुम्ही काही सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता.
कन्या -आज मित्र आणि प्रिय जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा किंवा खरेदीला जाण्याचा प्लॅन बनवला जाऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात सुख-शांतीचे वातावरण राहून आनंदाचा अनुभव येईल. तुम्हाला मित्र आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल.