बर्मिंगहॅम: 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाची दमदार कामगिरी कायम आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 ( Commonwealth Games 2022 ) 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये भारताचा रविवारचा दिवस चांगला होता. भारताने वेटलिफ्टिंगमध्ये आणखी दोन सुवर्णपदके जिंकली. प्रथम जेरेमी लालरिनुंगाने सुवर्ण जिंकले, त्यानंतर 73 किलोमध्ये अचिंता शेउलीने भारताला तिसरे सुवर्णपदक मिळवून दिले. सोमवारी (1 ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. पुरुष हॉकी संघासाठी चौथा दिवस मोठा ठरणार आहे.
सोमवारी (1ऑगस्ट) होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेचे भारताचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. (भारतीय वेळेनुसार)
पोहणे:
पुरुषांची 100 मीटर बटरफ्लाय हीट 6 - साजन प्रकाश (दुपारी 3.51)
टेबल टेनिस:
पुरुष सांघिक उपांत्य फेरी (दुपारी 11.30)
बॉक्सिंग:
48-51किग्रा राउंड ऑफ 16: अमित पंघाल ( दुपारी 4.45 PM)
54-57 किलो: हुसामुद्दीन मोहम्मद (संध्याकाळी 6)
75-80 किलो: आशिष कुमार (मंगळवार सकाळी 1 वाजता)
सायकलिंग:
महिला कीरन पहिली फेरी -त्रिशा पॉल, शुशिकला आगाशे, मयुरी लुटे (सायंकाळी 6.32)
पुरुषांची 40 किमी पॉइंट शर्यत पात्रता - नमन कपिल, वेंकाप्पा केंगलकुट्टी, दिनेश कुमार, विश्वजीत सिंग (संध्याकाळी 6.52)
पुरुषांची 1000 मीटर वेळ चाचणी अंतिम - रोनाल्डो लॅटनजॅम, डेव्हिड बेकहॅम (रात्री 9.37)
महिलांची 10 किमी स्क्रॅच शर्यत अंतिम: मीनाक्षी (रात्री 9:37)