महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

CWG 2022 CLOSING CEREMONY : राष्ट्रकुल स्पर्धांचा शानदार समारोप, 61 पदकांसह भारत चौथ्या स्थानावर - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022

बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारताने जबरदस्त कामगिरी केली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 61 पदके जिंकली आहेत. यामध्ये 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताला बहुतेक पदके कुस्ती आणि वेटलिफ्टिंगमधून मिळाली आहेत. भारत या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला आहे.

commonwealth games 2022
commonwealth games 2022

By

Published : Aug 9, 2022, 10:19 AM IST

बर्मिंगहॅम : सोमवारी बर्मिंगहॅममधील अलेक्झांडर स्टेडियममध्ये समारोप समारंभासह राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा2022 ची सांगता झाली. 11 दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धेत भारतातील सुमारे 215 खेळाडूंनी पंधरा खेळांमध्ये सहभाग घेतला. 22 सुवर्णांसह भारताने 61 पदके जिंकली. या सोहळ्यात सुवर्ण विजेती बॉक्सर निखत झरीन आणि टेबल टेनिस स्टार शरथ कमल हे भारताचे ध्वजवाहक होते. शरथने बर्मिंगहॅम येथे टेबल टेनिसमध्ये चार पदके जिंकली. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याचबरोबर बॉक्सिंगमध्ये निखतने सुवर्णपदक पटकावले.

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 चा आता अधिकृतपणे समारोप झाला आहे. आता 2026 मध्ये, पुढील आवृत्ती व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केली जाईल. बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदकांसह एकूण 61 पदकांसह चौथे स्थान पटकावले. त्याच वेळी ऑस्ट्रेलियाने 67 सुवर्ण, 57 रौप्य आणि 54 कांस्य अशी एकूण 178 पदकांसह पहिले स्थान पटकावले.

हेही वाचा -CWG 2022 :अचंता शरथ कमलने रचला इतिहास; लियाम पिचफोर्डवर मात करत घेतली 'गोल्डन' भरारी

ABOUT THE AUTHOR

...view details