मुंबई :क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन (Cryptocurrency Prices Today) आहे. ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. बिटकॉइनहे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे.
क्रिप्टोकरन्सीचे प्रकार : 1. बिटकॉइन (Bitcoin) :बिटकॉइन ही जगामधली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. २००९ मध्ये सतोशी नाकामोटो नावाच्या व्यक्तीने श्वेतपत्रिका ऑनलाइन प्रकाशित केली. तथापि नंतर हे उघड झाले की सतोशी नाकामोटो हे त्या व्यक्तीचे खरे नाव (Cryptocurrency Prices Today In India) नव्हते.
2. लिटकॉइन (Litecoin) :बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉइन लॉन्च करण्यात आले. बिटकॉइनला पर्याय म्हणून लिटकॉईन २०११ मध्ये लाँच केले होते. इतर क्रिप्टोकरन्सीं प्रमाणेच लिटकॉइन हे एक ओपेन स्त्रोत आहे, ग्लोबल पेमेंट नेटवर्क आहे जे पूर्णपणे विकेंद्रित आहे, म्हणजे सरकारचे कोणतेही केंद्रीय अधिकारी नाहीत. लिटकॉइन एक पीअर-टू-पीअर क्रिप्टोकरन्सी आणि मुक्त-स्रोत सॉफ्टवेअर प्रकल्प आहे. चार्ली ली ह्याने लिटकॉइनची निर्मिती केली आहे. चार्ली ली हा गूगल ह्या जगप्रसिद्ध कंपनीत नोकरी करणारा एक कर्मचारी (Cryptocurrency Prices 15 December 2022) आहे.