श्रीनगर-श्री अमरनाथ यात्रेसाठी तैनात सीआरपीएफ अधिकारी आणि जवानांना स्टिकी बॉम्बच्या ( magnetic IED threat in Amarnath ) धोक्याला कसे सामोरे जावे तसेच सतर्क राहण्याचे प्रशिक्षण ( CRPF officers and personnel training ) दिले जात आहे. सतत सतर्क राहून हा धोका ( Shri Amarnath Yatra preparation ) टाळता येऊ शकतो.
कोरोना महामारीमुळे दोन वर्षांनंतर या वर्षी जूनच्या अखेरीस अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. त्यामुळे या यात्रेला येणाऱ्या भाविकांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने यंदाची यात्रा यशस्वी करण्यासाठी आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. श्री अमरनाथ यात्रा या वर्षी 30 जूनपासून ( Amarnath Yatra starting date ) सुरू होत आहे. ही यात्रा 11 ऑगस्ट 2022 पर्यंत चालणार ( Amarnath Yatra closing dates ) आहे.
स्टिकी बॉम्बचे हल्ले अनेक प्रयत्न हाणून पाडले-सीआरपीएफच्या हिरानगर रेंजचे डीआयजी देवेंद्र यादव म्हणाले की, स्टिकी बॉम्बच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नेहमीच सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणत्याही वाहनाच्या किंवा व्यक्तीच्या तपासात हलगर्जीपणा होता कामा नये. शंका असल्यास, ते काढून टाकणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आम्ही आमच्या अधिकारक्षेत्रात तैनात असलेल्या सर्व सैनिक आणि अधिकाऱ्यांना या धोक्याबाबत सावध केले आहे. या संकटाचा नायनाट करण्यासाठी ते आवश्यक प्रशिक्षणही देत आहेत. स्टिकी बॉम्ब शोधण्यासाठी विशेष सेन्सर्स आणि डिटेक्टरचाही वापर केला जात आहे. ते म्हणाले की, सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे गेल्या वर्षात दहशतवाद्यांचे स्टिकी बॉम्बचे हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले आहेत.