कोलकाता -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच भाजपानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. मात्र, ममता बॅनर्जी देखील भाजपाच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. अमित शहा यांच्या सांगण्यावरून मतदारांना सीआरपीएफच्या जवानांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
चौथ्या टप्प्यासाठी 10 एप्रिल रोजी 44 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मतदानादरम्यान सीआरपीएफचे जवान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार मतदारांना त्रास देत आहेत.
यापूर्वीही दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंडिकेट क्रमांक 1, तर अमित शाह सिंडिकेट क्रमांक 2 आहेत, असे म्हटलं होते. अभिषेक, सुदीप आणि स्टालिन यांच्या मुलींच्या घरी केंद्रीय यंत्रणा पाठवल्या जात आहेत. तसेच भाजपा सलग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आहेत, असे हावडामध्ये एका सभेला संबोधित करताना दीदी म्हणाल्या होत्या.