महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Criticism of Modi In Saamana : विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत अन् पंतप्रधान डमरू वाजवतायेत;सामनातून आसूड - सामनाच्या अग्रलेखात मोदी सरकारवर टीका

हिंदुस्थानचे विद्यार्थी युक्रेनमधील सुमी, किव, खारकिव येथे आक्रोश करीत होते तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या प्रचार सभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. (Modi government bringing back children Ukraine) हे जर कोणाला 'ऑपरेशन गंगा' वाटले असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आजच्या सामनातून चांगलेच आसूड ओढले आहेत.

विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत अन् पंतप्रधान डमरू वाजवतायेत;सामनातून आसूड
विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत अन् पंतप्रधान डमरू वाजवतायेत;सामनातून आसूड

By

Published : Mar 7, 2022, 8:56 AM IST

Updated : Mar 7, 2022, 9:09 AM IST

मुंबई - आम्हीही तुमच्या झिंदाबादचे नारे द्यायला तयार आहोत. पण राजकारण काही काळ गंगार्पण करा. 'ऑपरेशन गंगा'चा खुळखुळा थांबवा आणि सुमीमध्ये, रशियात अडकलेल्या हजारो हिंदुस्थानी मुलांना सुखरूप घेऊन या. सुटका (evacuation) यालाच म्हणतात. युक्रेनमधून परतलेल्या मुलांचे तेच म्हणणे आहे. (Modi government On Ukraine ) 'ऑपरेशन गंगा' त्यालाच म्हणता येईल. (Ukraine from the Editoral of the Saamana) गंगेला आणखी किती बदनाम कराल असा? असा सामनातून थेट टोला भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

युक्रेनमध्ये वीस हजारांच्या आसपास विद्यार्थी अडकून पडले

युक्रेनमधून हिंदुस्थानी विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी झोपी गेलेले मोदी सरकार जागे झाले, पण युक्रेनमधून हाल-अपेष्टा सहन करून जे विद्यार्थी मायदेशी पोहोचले, त्यांनी 'ऑपरेशन गंगा' मोहिमेची पोलखोल केल्याने मोदी सरकारची झोप उडाली आहे. (Editoral Saamana) युक्रेनमध्ये वीस हजारांच्या आसपास विद्यार्थी अडकून पडले ते मोदी सरकारच्या 'ढिम्म' प्रवृत्तीमुळेच. युद्धाचे ढग जमा होत आहेत व मोदींचे दोस्त पुतीनभाई ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत याचे आकलन व्हायला आपल्या परराष्ट्र मंत्रालयास इतका उशीर का व्हावा? असा प्रश्नही यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

या काळात मुलांना अन्न-पाणी मिळाले नाही

या काळात अमेरिका व युरोपियन राष्ट्रांनी त्यांचे नागरिक आणि विद्यार्थी यांना युद्धाची पहिली गोळी उडण्याआधीच बाहेर काढले व आमचे विदेश मंत्रालय तेव्हा हिंदुस्थानी विद्यार्थ्यांसाठी 'ऍडव्हायजरी' म्हणजे मार्गदर्शक सूचना जाहीर करीत होते. ताबडतोब युक्रेन सोडा. खारकिव्ह किंवा किव प्रांतातून मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडा. (Criticism of Modi government In Saamana Editoral) यात सरकारचा सहभाग कुठे दिसतो? आपापले सामान घेऊन ही मुले स्वतःच बाहेर पडली. शेकडो मैल पायपीट करीत आर्मेनिया, पोलंड, स्लोव्हाकिया सीमांवर पोहोचली. त्यांना तेथे कोणीच मदत केली नाही. या काळात मुलांना अन्न-पाणी मिळाले नाही. बर्फात त्यांना उघड्यावर राहावे लागले. त्यांच्या या हाल-अपेष्टांचे चित्रण निवडणूकग्रस्त उत्तर प्रदेशात पोहोचले तेव्हा 'ऑपरेशन गंगा'चा उदय झाला. (back children from Ukraine) मग ते चार मंत्री पाठवले, विमाने गेली, बेजार आणि भुकेल्या विद्यार्थ्यांसमोर भाषणे दिली. मुलांना विमानात चढवल्यावर त्यांच्याकडून ''मोदी झिंदाबाद''चे नारे लगावून घेण्यात आले, पण या 'झिंदाबाद'मधील क्षीणपणाही समोर आला. शेवटी 'ऑपरेशन गंगा' हे एक राजकीय प्रचाराचे खेळणेच ठरले असा चिमटाही यामध्ये काढण्यात आला आहे.

देशात भाजपचे थोतांडी 'आयटी' सेलचे 'गोबेल्स' मुलांना कसे गुमराह करीत आहेत

जे घडले त्यास विद्यार्थ्यांची 'सुटका' म्हणता येणार नाही. ती देशात सरकारच्या 'ढिम्म'पणाबद्दल संतापाचा उद्रेक होताच उडालेली झोप होती. मायदेशी परतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्यांनी जे भोगले आणि सोसले त्याच्या थरारक कहाण्या सांगितल्या आहेत. देशात भाजपचे थोतांडी 'आयटी' सेलचे 'गोबेल्स' मुलांना कसे गुमराह करीत आहेत, तेसुद्धा समोर आले. ''विद्यार्थ्यांनी हाती तिरंगा घेऊन बाहेर पडावे, त्यांना कोणीही हात लावणार नाही'' इथपासून ते मोदी-पुतीन यांच्यात चर्चा झाली असून हिंदुस्थानी विद्यार्थी बाहेर पडून सुखरूप विमानात बसेपर्यंत सहा तासांसाठी युद्धविराम करण्यात येत असल्याच्या बातम्या पसरविण्यात आल्या. हा सर्व त्या मुलांचा जीव घेण्याचा प्रकार होता.

मोदी यांनी पुतीन यांच्याशी प्रेमपूर्वक वार्तालाप करून त्या मुलांना मदत करावी

आजही सुमी शहरात शेकडो विद्यार्थी अडकून पडले आहेत व त्यांचे अन्न-पाण्याशिवाय हाल सुरू आहेत. त्यांना घराबाहेर पडता येत नाही. त्यांची सुटका करून 'ऑपरेशन गंगा'चे कर्तृत्व दाखवायचे असेल तर येथे ती संधी आहे. रशियामध्ये हजारो मुले अडकली आहेत. हिंदुस्थानातील त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत. मोदी यांनी पुतीन यांच्याशी प्रेमपूर्वक वार्तालाप करून त्या मुलांना मदत करावी. युक्रेनमधील हिंदुस्थानी दूतावास टाळे लावून बाहेर पडला आहे. सुमीवर हल्ले सुरू आहेत व सुमी स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकलचे 1200 हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना कोणी सोडवायचे? शेवटचा हिंदुस्थानी नागरिक परत आणेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मंत्रीमहोदय जनरल व्ही. के. सिंग यांनी सांगितले आहे.

मंगळावर कुणी हिंदुस्थानी

अडकून पडले असतील तर त्यांचीही सुटका करू, असे ते म्हणाले होते. सध्या मंगळावरचे वगैरे राहू द्या, तूर्त सुमी मेडिकल युनिव्हर्सिटीत अडकलेल्या 1200 हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची तेवढी सुटका करा, जनरल साहेब! 'ऑपरेशन गंगा'मधून सुमी व रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना का दूर ठेवले? त्यांची वेळीच सुटका केली तर ती मुलेसुद्धा 'मोदी झिंदाबाद'चे नारे देतील. मुलांची सुटका करण्यास प्राथमिकता द्यायला हवी. युद्ध रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू आहे, पण झळा आणि कळा जगाला बसत आहेत. पुतीन वॉररूममध्ये आहेत. युक्रेनचे झेलेन्स्की प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहेत तर हिंदुस्थानचे पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रचारात अडकले आहेत, ही त्या अडकून पडलेल्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

गंगेला आणखी किती बदनाम कराल?

युक्रेनमध्ये एकूण जगभरातील सवापाच लाख विद्यार्थी होते. अनेक देशांनी आपले विद्यार्थी बाहेर काढले. हिंदुस्थानचे विद्यार्थी युक्रेनमधील सुमी, किव, खारकिव येथे आक्रोश करीत होते तेव्हा आपले पंतप्रधान वाराणसीच्या प्रचार सभेत गंगाकिनारी डमरू वाजवत होते. हेच जर कोणाला 'ऑपरेशन गंगा' वाटले असेल तर तुम्हाला कोपरापासून साष्टांग दंडवत. आम्हीही तुमच्या झिंदाबादचे नारे द्यायला तयार आहोत, पण राजकारण काही काळ गंगार्पण करा. 'ऑपरेशन गंगा'चा खुळखुळा थांबवा आणि सुमीमध्ये, रशियात अडकलेल्या हजारो हिंदुस्थानी मुलांना सुखरूप घेऊन या. सुटका (evacuation) यालाच म्हणतात. युक्रेनमधून परतलेल्या मुलांचे तेच म्हणणे आहे. 'ऑपरेशन गंगा' त्यालाच म्हणता येईल. गंगेला आणखी किती बदनाम कराल? असा थेट सवाल यामध्ये उपस्थित केला आहे.

हेही वाचा -Chitra Ramakrishna Arrested : चित्रा रामकृष्ण यांना अटक, सीबीआयची कारवाई

Last Updated : Mar 7, 2022, 9:09 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details