दिल्ली - गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक (2022)सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या टीका फेटाळून लावत गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयकाबात काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाणार आहे. दोषी किंवा आरोपी व्यक्तीच्या ओळखीसाठी जैविक नमुने, बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर प्रकारचे नमुने घेण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
विरोधकांकडून जोरदार टीका -यावर अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांनी आपले समर्थन दर्शवले आहे. तर, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याला कडाडून विरोध दर्शवला आहे. (Criminal Procedure Identification Bill Passed ) दरम्यान, या विधेयकावरलोकसभेत जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी हे विधेयक मूलभूत हक्क आणि मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. हे विधेयक गोपनीयतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचेही विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे.