महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Crime News : एकाच कुटुंबातील ४ जणांची चाकू आणि विळ्यानं निर्घृण हत्या

Crime News : तामिळनाडूतील तिरुपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. या हत्येमागे कुटुंबप्रमुखाचा जुना कर्मचारी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. वाचा पूर्ण बातमी...

4 members of same family murdered
4 members of same family murdered

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 8:42 AM IST

तिरुपूर (तामिळनाडू) :Crime News :तामिळनाडूतील तिरुपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथे दोन महिलांसह एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.

चाकूनं आणि विळ्यानं हल्ला केला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यापारी सेंथिल कुमार यांच्या मालकीच्या मोकळ्या जागेत पुरुषांचं एक टोळकं दारू पीत बसलं होतं. सेंथिल कुमार यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर या टोळक्यानं सेंथिल कुमार यांच्यावर चाकूनं आणि विळ्यानं हल्ला केला. सेंथील यांच्या कुटुंबीयांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सर्वांवर निर्दयीपणे हल्ला केला. यात सेंथिल कुमार आणि त्यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यातच त्यांचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी मृतदेह देण्यास विरोध केला : मोहनकुमार, रथिनांबल आणि पुष्पवती अशी अन्य मृतांची नावं आहेत. त्यानंतर पल्लडम पोलिसांनी घटनास्थळ गाठून सेंथिल कुमार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पल्लडम शासकीय रुग्णालयात पाठवला. मात्र नातेवाईकांनी कुटुंबातील इतरांचे मृतदेह घटनास्थळावरून नेण्यास विरोध केला. मारेकर्‍याला अटक केल्यानंतरच अन्य तिघांचे मृतदेह ताब्यात देऊ, असं नातेवाईक आणि गावकऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तडजोड केल्यानंतर इतर ३ जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपास सुरू केला :पोलिसांनी सांगितलं की, ते या निर्घृण हत्येमागील हेतू तपासत आहेत. या क्रूर कृत्यामागे सेंथिल कुमार यांचा जुना कर्मचारी वेंकीटेसन आणि त्याची टोळी असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी काही महिन्यांपूर्वी सेंथिल कुमार यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. पेमेंटवरून झालेल्या वादामुळे सेंथिल कुमार यांनी व्यंकटेशनला नोकरीवरून काढून टाकलं होतं.

आरोपींच्या अटकेसाठी नागरिकांचा रास्ता रोको : एकाच कुटुंबातील ४ जणांची हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी कोईमतूर-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको केला. त्यामुळे या महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. सध्या या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.

हेही वाचा :

  1. Chandrapur Murder : तुरुंगातुन सुटून आल्यानंतर दोन दिवसानंतर खून, अटकेनंतरच्या 'त्या' कृत्यानं पोलीसही चक्रावले!
  2. Youth Beaten Half Naked : तरुणाला अर्धनग्न करून बेल्टनं बेदम मारहाण; पाहा व्हायरल व्हिडिओ
  3. Baramati Crime News : सुपारी देऊन पोटच्या मुलाचा केला खून; वयोवृद्ध मजूर दाम्पत्यासह पाच जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details