नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेस (TMC) च्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आज विरोधकांची बैठक बोलावली आहे. अनेक विरोधी नेत्यांची बैठक घेऊन राष्ट्रपती निवडणुकीवर त्या चर्चा करतील. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याचा यातून प्रयत्न होईल.
टीआरएस सहभागी होण्याची शक्यता कमी -मात्र CMO सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) या बैठकीमध्ये उमेदवारासाठी सहमती करता प्रतिनिधी पाठवण्याची शक्यता नाही. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीही या बैठकीत सहभागी होत नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतरच 'आप' या मुद्द्यावर विचार करेल, असेही पक्षातील सूत्रांनी सांगितले. एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी या बैठकीला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेसला आपला विरोध आहे. त्यामुळे त्यांना बोलावले असल्याने आपणाला जरी बोलावले असते तरी आपण गेलो नसतो असे एएनआयशी बोलताना ओवेसी म्हणाले.
कोण-कोण राहणार उपस्थित - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी राजधानी दिल्लीत आहेत. बैठकीपूर्वी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला होणार असून २१ जुलैला निकाल जाहीर होणार आहेत. या बैठकीत माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचा मुलगा आणि जनता दल (एस) नेते एचडी कुमारस्वामी, राष्ट्रीय लोक दलाचे जयंत चौधरी आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती भाग घेण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसला बरोबर घेऊनच विरोधकांची एकी साधली जाईल असे म्हटले आहे.