अहमदाबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) संघात तीन सामन्याच्या वनडे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी एक बॅड न्यूज आहे. कोरोना महामारीने भारतीय संघाच्या ताफ्यात शिरकाव केला आहे. यामध्ये भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांचा समावेश आहे. शिखर धवन, रुतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या प्रमुख खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच स्टँडबाय खेळाडू नवदीप सैनीला (Standby player Navdeep Saini) देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
INDvWI : भारतीय क्रिकेट संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव: संघातील प्रमुख खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण - Narendra Modi Stadium
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात तीन सामन्याच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघात कोरोनाने थैमान घातले आहे. कारण संघातील प्रमुख खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण (COACHING STAFF TEST POSITIVE) झाली आहे.
भारतीय संघ सोमवारी वनडे मालिकेसाठी अहमदाबाद येथे दाखल झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या चाचणीत हे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलिप (Fielding coach T. Dilip), मसाजीस्ट राजकुमार व इतर एक सदस्य पॉझिटिव्ह आल्याची माहिती हाती आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
तत्पुर्वी काल वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज संघातील पहिला वनडे 6 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. तसेच दुसरा आणि तिसरा वनडे सामना अनुक्रमे 9 आणि 11 तारखेला होणार आहे. वनडे मालिकेतील तीन ही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळले जाणार आहे. त्याचबरोबर हे सर्व सामने कोरोना महामारीमुळे बंद दाराआड होणार आहे.