महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सावधान! 'तो' पुन्हा येतोय, केरळमध्ये आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तामिळनाडूसह कर्नाटकमध्ये अलर्ट - कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव

COVID 19 sub variant JN.1c : केरळमध्ये कोविड 19 च्या नवीन व्हेरिएंट आढळलाय. 79 वर्षीय महिलेच्या नमुन्यात कोविड-19 चे व्हेरिएंट JN.1 ची पुष्टी झालीय. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता.

COVID 19 sub variant
COVID 19 sub variant

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2023, 9:23 AM IST

तिरुवअनंतपुरम COVID 19 sub variant JN.1c :केरळमध्ये 8 डिसेंबर रोजी कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटच्या एका रुग्णाची नोंद झालीय. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिलीय. त्यांनी सांगितलंय की, 18 नोव्हेंबर रोजी 79 वर्षीय महिलेच्या नमुन्याची आरटी-पीसीआरद्वारे चाचणी केली होती. या चाचणीतून तिला कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची लागण झाल्याचं निदान झालं. या महिलेला इन्फ्लूएंझासारख्या आजाराची सौम्य लक्षणे होती.

अद्याप दुसरं प्रकरण नाही : सूत्रांनी सांगितलं की, सध्या देशातील कोविड-19 प्रकरणांपैकी 90 टक्क्यांहून अधिक प्रकरणं गंभीर नाहीत. तसंच संक्रमित लोक त्यांच्या घरात एकटे राहत आहेत. यापूर्वी सिंगापूरमध्ये एका भारतीय प्रवाशाला JN.1 चा संसर्ग आढळून आला होता. हा व्यक्ती मूळचा तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील रहिवासी असून 25 ऑक्टोबरला तो सिंगापूरला गेला होता. तिरुचिरापल्ली जिल्ह्यात किंवा तामिळनाडूमधील इतर ठिकाणी JN.1 च्या संसर्गाची नवीन रुग्ण आढळली नाहीत. सूत्रांनी सांगितलं की, 'भारतात JN.1 प्रकाराचं दुसरं कोणतंही प्रकरण नोंदवलं गेलं नाही.'

  • JN.1 व्हेरिएंट काय? : सूत्रांनी सांगितलं की JN.1 व्हेरिएंट प्रथम लक्झेंबर्गमध्ये आढळला. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. हे पिरोला प्रकारातून येतं. त्यात लक्षणीय प्रमाणात अनन्य उत्परिवर्तन आहेत. विशेषत: स्पाइक प्रोटीनमध्ये, जे संसर्ग वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीला हानी पोहोचवण्याचे काम करू शकतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून : केरळमध्ये उदयास आलेल्या JN.1 व्हेरिएंटच्या बाबतीत, भारत सरकारनं असं म्हटलंय की, लोकांचं मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये मॉक चाचण्या घेतल्या जातील. आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेचे उपाय म्हणून ड्रिल घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

तामिळनाडू आणि कर्नाटक अलर्टवर : तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम म्हणाले की, शेजारच्या केरळ आणि सिंगापूरमधील संसर्गाच्या प्रकरणांमध्ये नुकत्याच झालेल्या वाढीमुळं राज्य सरकारनं कोणत्याही नवीन कोविड उद्रेकाला सामोरं जाण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. तसंच शेजारच्या केरळमध्ये कोविडची नवीन प्रकरणं समोर आल्यानं, कर्नाटक सरकारनं राज्याची तयारी तपासण्यासाठी रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतलाय. कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांना सांगितलं की, कर्नाटक वैद्यकीय पुरवठा महामंडळामार्फत चाचणी कीट खरेदी करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. New Corona Testing : कोरोना रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे की नाही, प्लाझ्मा रिपोर्टमधून होईल निदान
  2. Covid19 Review Meeting: कोरोना वाढला, हॉटस्पॉट शोधा.. चाचण्या, लसीकरण वाढवा, केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details