महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जाणून घ्या देशभरातील कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी - जिनोव्हा बायोफार्मा

आतापर्यंत भारतात 9,826,775 कोरोना रूग्ण आढळले. यामध्ये 1,42,628 मृत्यूंचा समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण 9,324,328 रूग्ण बरे झाले आहेत. तर, देशात सध्या 359,819 सक्रिय रूग्ण आहेत. जे एकूण प्रकरणांच्या 3.66 टक्के आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रूग्ण आढळले आहेत. दरम्यान, केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांत कोरोना वेगाने पसरत आहे.

corona update
corona update

By

Published : Dec 13, 2020, 1:20 AM IST

हैदराबाद - भारतातील सक्रिय कोविड -19 ची प्रकरणे 3.6 लाखांपेक्षा खाली गेले आहेत. कोरोना पसरण्यात सतत घसरण सुरूच आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिली. तसेच सहा सर्वाधिक प्रभावित राज्यांमध्ये दररोज कोरोनाव्हायरसच्या बाबतीत सतत घट झाली आहे. गेल्या 15 दिवसांपासून नोंदविण्यात आलेल्या रोजच्या प्रकरणांपेक्षा देशातील नवीन बरे झालेल्या रूग्णांची नोंद सर्वाधीक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

जिनोव्हा बायोफार्मा या कंपनीकडून कोरोनावर देशातील पहिले ‘एमआरएनए’ या तंत्रज्ञानावर आधारीत ‘एजीसी019’ ही लस विकसित केली जात आहे. या लसीच्या मानवी चाचणीस परवानगी मिळाली आहे. अशी माहिती सरकारने आज शुक्रवारी दिली.

corona update

दिल्लीतील कोरोना परीस्थितीचा आढावा-

नवी दिल्ली: दिल्लीत शनिवारी कोविड -19 चे 1,935 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 73,000 पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या. पॉझिटीव्ह दर 2.64 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीतील पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण अनुक्रमे 4.96 टक्के, 4.78 टक्के, 4.2, टक्के 3.68 टक्के आणि आता 3.15 टक्क्यांवर गेले आहे.

तसेच, 8 डिसेंबर रोजी पॉझिटीव्ह येण्याचे प्रमाण पुन्हा वाढून 4.23 टक्क्यांवर गेले होते. ते 9 डिसेंबर रोजी पुन्हा घसरून 3.42 टक्क्यांवर आणि 10 डिसेंबरला 2.46 टक्क्यांवर गेले. 11 डिसेंबरला पुन्हा ते 3.33 टक्क्यांवर पोचले होते.

महाराष्ट्रतील कोरोना परीस्थितीचा आढावा-

मुंबई: पुणे शहरातील शाळा 3 जानेवारी 2021 पर्यंत बंद राहतील. पुणे महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील शाळा पुन्हा सुरू करण्यास स्थगिती दिली आहे.

आज राज्यात 4,259 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 18,72,440 वर पोहचला आहे. राज्यात आज 80 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 48,139 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.57 टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण 73,542 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पंजाबमधील कोरोना परीस्थितीचा आढावा-

चंदीगड: पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी राज्यात 1 जानेवारी 2020 पर्यंत नाईट कर्फ्यू वाढविण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मेळाव्यात येणाऱ्या लोकांच्या संख्येवरही नवीन वर्षापर्यंत अंकुश ठेवला आहे. राज्यातील लोकांकडून, विशेषत: विवाह सभागृहात काटेकोरपणे नियमांचे पालन, व्हावे यासाठी पंजाब सरकारने पोलिसांना निर्देश जारी केले आहेत.

हेही वाचा-शेतकरी आंदोलन आणखी तीव्र, १४ डिसेंबराला सर्व शेतकरी नेते बसणार उपोषणाला

हेही वाचा-केरळमध्ये कोरोना लस मोफत मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ABOUT THE AUTHOR

...view details