हैदराबाद -भारतातील एकूण कोरोनाबधितांचा आकडा 93 लाख 51 हजार 109 वर गेला असून मृतांची एकूण संख्या 1 लाख 36 हजार 200 वर पोहोचले आहे. आतापर्यंत 87 लाख 59 हजार 969 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या देशात 4 लाख 54 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत.
महाराष्ट्र
शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) सायंकाळपर्यंत राज्यात 5 हजार 965 नव्या कोरोनाग्रस्तांचा वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोना बाधितांचा आकडा 18 लाख 14 हजार 515 वर पोहोचला आहे. राज्यात 75 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 46 हजार 986 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.59 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 89 हजार 905 सक्रिय रुग्ण आहेत.
दिल्ली
दिल्लीत शनिवारी 4 हजार 998 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण बाधितांचा आकडा 5 लाख 61 हजार 742 वर पोहोचला आहे. शनिवारी 89 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात 36 हजार 578 सक्रिय रुग्ण आहेत.
बिहार
बिहार राज्यात शनिवारी 713 नवे रुग्ण आढळले असून बाधितांचा एकूण आकडा 5 हजार 585 वर पोहोचला आहे. तर 5 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला असून आतापर्यंत एकूण 1 हजार 253 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.