चैन्नई - देशातील वाढत्या कांदा आणि इंधनच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. या दरवाढीचा एक प्रकारे निषेध नोंदवत चैन्नईमध्ये नवविवाहित जोडप्याला मित्रपरिवाराने भेट म्हणून पाच लिटर पेट्रोल, कांद्याची माला आणि एलपीजीचा सिलेंडर दिला आहे. हे पाहुन लग्न मंडपात आनंदाचे वातावरण पसरले. समोर असलेल्या लोकांना हसू आवरत नव्हते. तथापि, तामिळनाडूमध्ये एका लिटर पेट्रोलची किंमत 92 रुपये आणि एलपीजीची किंमत प्रति सिलेंडर 900 रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्याने देशात इंधनाचे दर वाढले आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच वस्तूंच्या दरावर होत असून त्यामुळे महागाई वाढत आहेत महाराष्ट्रात सर्वाधिक दर परभणीमध्ये आहे. येथे पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. पावर पेट्रोल 101.86 वर पोहोचले आहे.