नवी दिल्ली :भारताची राजधानी असलेल्या दिल्लीच्या एका रेस्टॉरंटमध्ये महिलेने साडी घातल्याने तिला प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे भारतभर गोंधळ उडाला आहे. शिवाय, लोकही रेस्टॉरंटवर संतापले आहेत. दरम्यान, रेस्टॉरंटमध्ये साडी घालण्यास परवानगी नाही. यावरून महिला आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लोक रेस्टॉरंटवर टीका करत आहेत.
'फक्त स्मार्ट कॅज्युअल्सला परवानगी, साडी स्मार्ट कॅज्युअल्समध्ये नाही'
साडी नेसलेल्या एका महिलेस रेस्टॉरंटमध्ये जाण्यास नकार दिल्यानंतर दिल्लीतील 'अकिला' नावाचे रेस्टॉरंट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना विचारले की, तिला आत का जाऊ दिले जात नाही? त्यावर कर्मचारी म्हणाली की "मॅडम, आम्ही फक्त स्मार्ट कॅज्युअल्सला परवानगी देतो आणि साडी स्मार्ट कॅज्युअल्समध्ये येत नाही."
वाचा नक्की काय आहे प्रकरण?
दक्षिण दिल्लीच्या अकिला रेस्टॉरंटमध्ये अनीता चौधरी यांना साडी नेसून गेल्यामुळे प्रवेश दिला नाही. ही घटना 19 सप्टेंबरची असल्याचे सांगितलेत जात आहे. हा व्हिडिओ 19 सप्टेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या महिलेने 20 सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर लोक संतप्त प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.
महिलेचा आरोप काय?
अनिता चौधरी यांनी त्यांना प्रवेश नाकारल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिल्याचाही एक व्हिडिओ व्हायरल केला. 'माझ्या मुलीचा वाढदिवस होता. मी आधीच टेबल बुक केला होता. त्यामुळे अकिला रेस्टॉरंटमध्ये गेली, तिथे गेल्यानंतर मला रोखण्यात आले. शिवाय मला सांगण्यात आले की तुम्ही साडी नेसून जाऊ शकत नाही. जेव्हा मी हॉटेल मॅनेजरला विचारले की हा तुमचा नियम आहे का? तेव्हा मला उत्तर देण्यात आले नाही. तसेच आम्ही पोलिसांना बोलवू आणि त्यांनी त्यांच्या बाउन्सर्सनाही बोलावले. पण आता ते खोटे बोलत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्या समोर येऊन बोलावे', असे अनिता यांनी म्हटले आहे.